पान:लोकहितवादी.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३० या दहा अहमदाबादेस मा आंगच्या मगर झाल लोकहितवादी. जज्ज नेमले. काही दिवस मुंबई येथे स्मॉलकॉज कोडतात काम केल्यावर गोपाळराव अहमदाबाद येथे स्मॉलकॉज कोर्टाचे कायम जज्ज झाले. १८६७ सालपासून १८७६ पर्यंत म्हणजे जवळ जवळ १० वर्षे ते तेथेच होते. ___या दहा वर्षांत एकाच ठिकाणी वास्तव्य झाल्यामुळे गोपाळरावांच्या ओळखी वगैरे अहमदाबादेस पुष्कळ मोठमोठ्या लोकांशी झाल्या; व निस्पृहपणा, परोपकारीपणा इत्यादि आंगच्या अनेक गुणांमुळे त्यांचे वजनही बसले. त्याचप्रमाणे वरचेवर बदल्या वगैरे झाल्या म्हणजे जम कोठेच बसत नाही, कोणत्याही कामांत लक्ष लागत नाहीं च जी थोडीफार फुरसत सांपडते ती फुरसत गप्पा मारण्यांत किंवा केवळ खेळांत जाते; अशी आज पुष्कळशा सरकारी अधिकाऱ्यांची स्थिती आहे. आपले काम सांभाळून फुरसतीच्या वेळी लोकांच्या उपयोगी पडावे अशी हौस पुष्कळांना निदान तरुणपणी तरी वाटत असत, तिचा उपयोग होत नाही. अशी स्थिती गोपाळरावांची झाली नाही, हे महाराष्ट्रांतील व गुजराथेंतील लोकांचे सुदैवच समजावयाचें. अहमदाबाद शहरांत त्यांच्या प्रोत्साहनाने व सल्ल्याने लवकरच अनेक लोकोपयोगी संस्था व चळवळी स्थापन झाल्या. याशिवाय आपल्या खाजगी किंवा सार्वजनीक कामासाठी कोणीही व कसाही माणूस त्यांच्याकडे जावो त्याचे म्हणणे ऐकून घेऊन त्याला सल्लामसलत देण्यास गोपाळराव नेहमीं तत्पर असत.सरकारी कामें व दररोजचा प्रपंचव्यवसाय संभाळून या इतक्या गोष्टींत त्यांना कसे लक्ष घालतां येत असे याचे आश्चर्य वाटते. परंतु रिकामपणामुळे फुरसत नाही, या वर्गातले गोपाळराव नव्हते. दररोजच्या नित्यक्रमाचा त्यांचा व्यवसाय दांडगा असला तरी तो ठरावीक व नियमबद्धही होता. त्यामुळे इतके सगळे उद्योग संभाळून लेखन-वाचनाकरितां वेळ सांपडे तो निराळाच. हे।