पान:लोकहितवादी.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सिव्हिलियनांची तक्रार. ते पाहून काहीतरी निश्चित नियम तयार करावयाचे होते. इनाम कमिशनचे काम करीत असतांना गोपाळरावांना अशा प्रकारच्या कामाचा बराच अनुभव आला होता. ती गोष्ट लक्षात घेऊन सरकारने या कामावर त्यांची नेमणूक केली. त्यावेळी तयार झालेल्या Digest च्या पुस्तकांपैकी बराचसा भाग यांच्या परिश्रमाने व त्यांच्या देखरेखेखाली तयार झालेला आहे व त्यांतल्यात्यांत पुस्तकाच्या शेवटी जोडलेले वारसा वगैरे हक्कासंबंधी विवेचन असलेले परिशिष्ट यांचे आहे, अशी माहिती त्यांचे चिरंजीवांकडून मिळते. ___गोपाळरावांची नोकरीही फार दिवस टिकली नाही. काम लवकरच संपलें व काही दिवस गोपाळराव घरीच होते. पण त्यांची झालेली नोकरी लक्षात घेऊन सरकार त्यांची कोठे तरी सोय लावण्याची संधी पाहात होते व ती लवकर आलीही. १८५८ सालच्या राणीच्या जाहीरनाम्यांत एक कलम असें होतें की, लायक माणूस मिळाल्यास गोरा काळा हा भेद मनांत न आणतां सरकार त्याच्या योग्यतेप्रमाणे व लायकीप्रमाणे कोणत्याही जागी त्याची नेमणूक करील. या कलमाला अनुसरून सन १८६२ सालीं, गोपाळरावांची नेमणूक Civil Service मध्ये करावी, अशी शिफारस मुंबईसरकारनें सेक्रेटरी ऑफ स्टेट यांचेकडे केली व त्यांस अहमदाबाद येथे असिस्टंट जज्ज नेमिलें. आमच्या व मुंबई सरकारच्या दुर्दैवाने येथील गोरे सिव्हिलिअन या नेमणुकीविरुद्ध गिल्ला करूं लागले व त्या चळवळीचा सेक्रेटरी ऑफ स्टेट यांचे मनावर परिणाम होऊन गोपाळरावांच्या सिव्हिल सर्व्हिसमधील नेमणुकीस त्यांची मंजुरी मिळाली नाही. तरी पण मुंबईसरकारने पगार वगैरे बाबतींत आपले म्हणणे कायम ठेवून गोपाळरावांस १८६५ च्या ऑगस्ट महिन्यांत अॅक्टिंग