पान:लोकहितवादी.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८ लोकहितवादी. तसे किती जणांना वाटले असते हाही प्रश्न विचार करण्याजोगा आहे. झालें तें आवश्यक होते व म्हणूनच ठीकही झाले; असाच अभिप्राय एकंदरीत या कमिशनबद्दल द्यावा लागेल. गोपाळरावांच्या हातून व्यक्तिशः गैरवर्तणूक झाली असा आक्षेप कोणी घेत नाही. त्यांच्यावर आक्षेप एवढाच आहे की, त्यांनी सरकारची नोकरी अगदी नेकीने-कदाचित् फाजील नेकीने-बजावली. व अशी टीका करतांना टीकाकार, गोपाळराव हे नोकर होते ही गोष्ट विसरून कमिशनच्या धोरणासंबंधाने जे आक्षेप घ्यावयाचे ते त्यांच्याच माथीं मारतात. अर्थातच अशा निष्कारण आक्षेपांना गोपाळरावांच्या तर्फे उत्तर देण्याची जरूरी नाही. कमिशनचे काम संपल्यानंतर सरकारने गोपाळरावांच्या कामाचा मुद्दाम गौरव केला व पुढे एका सरकारी सर्विस कमिशनसमोर जस्टिस नानाभाई हरिदास यांनी जाहीर रीतीने गोपाळरावांच्या नेकीबद्दल उल्लेख केला, या गोष्टींतच तें उत्तर एक प्रकारे आलेले आहे. पुढे ता. ४ मार्च १८६१ ला कमिशनचे काम संपलें व गोपाळरावांची ही नोकरीही संपली. पण याच सुमारास हिंदू व मुसलमान यांच्या धर्मशास्त्रांच्या व्यवहार भागांचें Digest म्हणजे थोडक्यांत गोषवारा तयार करण्याचे काम या वेळी मुंबई हायकोर्टाने हाती घेतले होते. व त्या कामी हिंदू धर्मशास्त्र व चालीरीती यांची माहिती असलेल्या कोणातरी लायक गृहस्थाची नेमणूक करणे जरूर होते. श्रुतिस्मृतींचे आधार शोधून काढण्याकरितां शास्त्रीपंडीत होते; पण प्रत्येक चालीरीतीसंबंधाने निरनिराळे शास्त्राधार, रूढीचे वेगवेगळे प्रकार, वगैरे असल्यामुळे निरनिराळ्या प्रकारांचे वर्गीकरण करून त्यांचा काहीतरी मेळ लावणे अवश्य होते. वारसा वगैरे अनेक हक्कांसंबंधाने निरनिराळ्या रूढी काय आहेत