पान:लोकहितवादी.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७ दोन आक्षेप चालणे हे कमिशनच्या प्रत्येक कामगाराचे कर्तव्यच होते. तेव्हां या बाबतींत गोपाळरावांबद्दल आक्षेप घेणे शक्य आहे ते खालीलप्रमाणे: (१) असल्या प्रकारच्या कमिशनमध्ये नोकरी करणे हे कितपतसें योग्य होते ? ( २ ) नोकरी पत्करिल्यानंतर त्यांनी आपले काम चोखपणाने केले की नाही? पहिल्या आक्षेपाचे उत्तर स्पष्टच आहे. दर नव्या कारकीर्दीच्या आरंभी एकदां व केव्हां केव्हा अनेकदां अशी चौकशी एतद्देशीय राज्यकर्ते करीत असत असें मनरो साहेबांनी स्पष्टच म्हटले आहे. या प्रकारचे अनुकरण परकीय इंग्रज सरकारने केले ही गोष्ट खरी आहे. त्यांत दोष असेल तर तो चौकशीचा नव्हे; तो राज्यकर्त्यांच्या परकेपणाचा. ताक नाही म्हणावयाचे असेल तर सासूने म्हणावें हवे तर; सुनेने म्हटले, की बिघडते असा हा प्रकार आहे. एकंदरीत इनाम कमिशनचे उद्देश व कामाची पद्धती यांस दोष देतां येत नाही असें मला वाटते. दिरंगाई झाली इतकी झाली नसती तर, राज्यक्रांतीपैकीच हा एक भाग होऊन व्यक्तींच्या वर्तणुकीचा प्रश्नच त्यांत उद्भवला नसता. पण दिरंगाईचा विचार करतांना ती टाळतां येणें कितपत शक्य होते हे आक्षेपकांनी पाहिलेले नाही. नवीन सरकारापाशी असलेले, थोडे, परके, अननुभवी, व बहुतेक लप्करी पेशांत आयुष्य गेलेले अधिकारी शांतता स्थापन करण्याचे अधीक जरूरीचे काम करीत होते. जुन्या पेशव्यांच्या नोकरांपैकी एकादा अनुभवी माणूस नेमला असता तर हे काम लवकर झाले असते खरें. पण त्या काळी दुसऱ्या बाजीरावाच्या दरबारी मंडळीपैकी असा एकादा पुरुष मिळाला असता की नाही याची शंका आहे. त्याचप्रमाणे हे काम कितीही चोख झाले अशी कल्पना केली तरी ते त्या वेळी