पान:लोकहितवादी.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इनाम कमिशनवर नेमणूक २३ झाले.” अशी त्यांनी उलट त्याची समजूत केली व ते स्नानभोजनाकरितां घरीं गेले. याच सुमारास म्हणजे १८५३ साली पावसाळ्यांत वाई येथे कृष्णाबाईस भयंकर पूर येऊन सबंध दोन आळ्या वाहून गेल्या व पुष्कळ नुकसान झाले. कित्येकांनी कमरेस लाह्यांचे पीठ बांधून कित्येक दिवस देवळाच्या शिखरावर बसून काढले. यावेळी गोपाळरावांच्या मदतीचा गोरगरिबांना पुष्कळ उपयोग झाला असेल हे सांगणे नकोच. 'ऐतिहासिक गोष्टी' या त्यांच्या पुस्तकांत वाई येथील या महापुरासंबंधाने लहानसें टांचण छापलेले आहे. वाई येथे कामावर असतांना काही दिवस, साताऱ्याचे त्यावेळचे एक मुख्य सदर अमीन यांचेवरील लांचाचे खटल्यांत, गोपाळरावांस असेसर नेमिले होते. याच सुमारास मुंबई सरकारने इनाम कमिशन नमिलें व त्यांत त्यांची कमिशनरचे दुय्यम, Assistant म्हणून दरमहा ३०० रुपयांवर नेमणूक झाली. याच ऑफिसांत त्यांस हळू हळू बदती मिळून त्यांच्या कामाची बरीच वाहवा झाली. त्यामुळे त्या वेळच्या मंडळींत व विशेषतः ज्यांची इनामें बुडाली त्यांच्या मनांत असा किंतू उत्पन्न झाला की, इनाम कमिशनरांनी सरकारास खूष करण्याकरितां आपल्या लोकांची इनामें मुदाम बुडविण्यास मदत केली. हा आक्षेप कित्येकांनी गोपाळरावांच्या चरित्रावरही घेतला आहे. याकरितां इनामकमिशनचे काम व त्यासंबंधी त्यांची जबाबदारी या विषयीं चार शब्द लिहितो. ही माहिती बरीचशी अपुरी आहे; पण मुळीच नाहीं त्यापेक्षा काहीतरी असलेली बरी या नात्याने तिचा उपयोग वाचकांनी जपून करावा एवढीच त्यांना सूचना देऊन ठेवतो. इनामांची पेशवाई अखेरच्या काळांतील स्थिती. पेशवाईच्या चढत्या काळांत व विशेषतः नाना फडणीसांचा जम पुण्यास