पान:लोकहितवादी.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२ लोकहितवादी. परंतु मुनसफीची जागा मिळण्यास त्यांना पुढे सहा वर्षे वाट पाहावी लागली. - सन १८५२ साली वाई येथे त्यांची पहिल्याने नेमणूक झाली. त्यांची तैलबुद्धी व अविश्रांत श्रम करण्याची हौस व विशेषतः त्यांचा निःस्पृहपणा व परोपकारी स्वभाव या गुणांमुळे त्या ठिकाणी ते वरिष्ठ अधिकारी व लोक या दोघांनाही सारखेच प्रिय झाले. त्यांच्या कामासंबंधाने जुडिशियल कमिशनर यांनी खालील उद्गार काढले आहेत:-- I have a very high opinion of his abilities. They are of very high order. His character is above suspicion and he appears to combine with them an earnest desire to discharge his duties conscientiously. अधिकारी या नात्याने त्यांच्या हाताखालचे कारकून, शिपाई यांच्याशी वागणूक फार ममतेची असे. याविषयीं वाई येथे घडलेली म्हणून त्यांची एक गोष्ट कळते ती अशी. कोर्टाची तपासणी करण्याकरितां वरिष्ठ अधिकारी येणार आहेत अशी अगाऊ सूचना एके दिवशी ( हा दिवस शनवार होता ) आली. तपासणी सोमवारी व्हावयांची होती. कारकुनापाशीं तपास करितां बारनिशी दप्तरांतील काम कारकून आजारी असल्यामुळे तसेंच शिल्लक आहे असें गोपाळरावांस कळले. बरे आहे, उद्यां रविवार आहे, होईल तेवढे आटपा असे सांगून ते घरी गेले व दुसऱ्या दिवशी सकाळी स्वतः कचेरीत येऊन बारनिशी दप्तर सोडून लिहावयास बसले. बिचारा बारनिशी कारकून जेवणखाण आटोपून एकदमच लवकर कचेरीत आला तो मुनसफसाहेब स्वतःच लिहीत बसले आहेत. हे पाहून तो फार खजील झाला व कदाचित् साहेब रागावतील म्हणून भयाने अगदी गांगरून गेला. गोपाळराव रागावले तर नाहींतच पण, " तुमचे काम मी बरेचसें आटपलेंच आहे, आतां राहिले आहे ते संध्याकाळपर्यंत आटपा म्हणजे