पान:लोकहितवादी.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६ यथार्थवादी." . प्रेरणा तरी दोन अगदी भिन्न माणसांकडून झाली असे म्हणणे धाडसाचे होईल. ज्ञानप्रकाशाचे हे जुने अंक चाळून पाहणाराला त्यांत दुसरी एक गोष्ट दिसते ती अशी. अंतर्मुख दृष्टीने आपली व्यंगें आपण शोधून आपण सुधारावीत अशा बुद्धीचे " लोकहितवादी" जसे त्यांत दिसतात तसेच आलेली हीन स्थिती केवळ इंग्रजामुळे आली व राजकीय सुधारणा झाली म्हणजे बाकी सर्व आपोआप घडून येईल, अशा रीतीने राजकीय विषयांना प्राधान्य देऊन इतर गोष्टींना गौणत्व देणारे “यथार्थवादी" ही त्यांत आहेत. लोकहितवादीनीं आत्मनिंदा करून आपल्या लोकांचा तेजोभंग केला अशा अर्थाची छटा पुढे निबंधमालाकारांच्या टीकेंत जी दिसते तशाच अर्थाचा आक्षेप यथार्थवादी यांनीही गोपाळरावांच्या लेखांवर घेतला होता, हे वाचकांच्या सहज लक्षात येईल. समाजाच्या सर्वांगीण सुधारणेत राजकीय सुधारणा हा एक महत्त्वाचा खरा पण अंश आहे असे प्रतिपादन करणारे पुढील पिढीतील "सुधारक" हे लोकहितवादींचे पुढल्या पिढीचे वारसदार. तसेंच आधीं राजकीय (व) मग सामाजीक अशा त-हेचा निष्कारण वाद वाढवून निदान एक पिढीपर्यंत तरी समाजसुधारणेच्या गाड्याला खीळ घालण्याचे पुण्य पदरीं जोडणारे “ उद्धारक” हे यथार्थवादींचे खरे वंशज. या दोन्हीही प्रवृत्ती आरंभापासूनच महाराष्ट्राच्या विचारांत होत्या. यापैकी अधीक उपयुक्त कोणती, अंतर्मुख सामाजीक प्रवृत्ति की बहिर्मुख राजकीय, या प्रश्नासंबंधी सर्वांस मान्य असा अखेरचा निर्णय आज निदान बाहेरच्या बोलण्यापुरता तरी लागलेला दिसतो. आणि येवढ्यापुरता लोकहितवादींच्या विचारसरणीचा अचुकपणा आज तीन पिढ्यानंतर मान्य झाला असेही म्हणता येईल. सन १८४६ सालीं गोपाळरावांनी मुनसफीची परीक्षा दिली होती.