पान:लोकहितवादी.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लोकहितवादी. प्रभाकर वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झालेल्या पत्रांचा उल्लेख नुक्ताच आला आहे. त्याच अनुरोधाने येथे हेही सांगून ठेवणे इष्ट वाटते की, वर्तमानपत्रांत लेख लिहून सामाजीक व राजकीय प्रश्नांविषयी लोकमत जागृत करण्याचा गोपाळरावजींनी केलेला हा केवळ आरंभ होता. पुढे लवकरच पुणे येथे ज्ञानप्रकाश हे पत्र त्यांच्याच प्रेरणेने निघाले. त्याचप्रमाणे यानंतर सुमारे पंधरा वर्षांनी मुंबईस इंदुप्रकाश पत्र सुरू झालें, तेही गोपाळरावजींमुळेच होय. अहमदाबाद, ठाणे इत्यादी ठिकाणी नोकरीवर असतांना देखील त्यांचा अशा प्रकारचा लेखनव्यवसाय चालू होताच. वृत्तवैभव पत्रांतील त्यांचे लेख, त्याप्रमाणेच बडोदें येथील मल्हारावांसंबंधाने अहमदाबाद येथे वर्तमानपत्रांतून लिहिलेले लेख व पेन्शन घेतल्यानंतर लोकहितवादी या नांवाचे त्यांनी चालविलेले स्वतंत्र मासीक ही सर्व त्यांच्या राजकीय व सामाजीक प्रश्नांविषयींच्या जीवंत आस्थेचींच उदाहरणे होत. त्यांपैकी बडोदें प्रकरण व लोकहितवादी मासिक यांचा पुन्हां उल्लेख पुढे जरूर त्या ठिकाणी येईलच. तूर्त ज्ञानप्रकाश पत्राशी असलेल्या निकट संबंधाविषयी दोन शब्द लिहितो. ज्ञानप्रकाशाच्या पहिल्या एक दोन वर्षांतील लेख त्यांचे कोणते व इतरांचे कोणते हे भाषेच्या लकबीवरून सांगणे कठीण आहे. तथापी विचारांच्या सारखेपणावरून कांहीं अनुमान काढावयाचे असल्यास पुणे येथील शाक्तपंथ, नेटिव अंमलदार, संस्कृत पाठशाळा, जुनी शिक्षणपद्धती, देशाचे दारिद्य व उद्योगधंदे, ब्रिटिशराज्यापासून फायदे व तोटे इत्यादींसारख्या विवीध सामाजीक व राजकीय विषयांसंबंधानें प्रभाकर व ज्ञानप्रकाश या पत्रांतील विचारसाम्य व प्रसंगविशेषी भाषेचे साम्यही इतके विलक्षण आहे की, या लेखांची कल्पना, निदान