पान:लोकहितवादी.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६ लोकहितवादी. हे वडिलांच्या वृद्धापकाळामुळे नुकतेच घरचा कारभार पाहूं लागल होते, ते सन १८३५ साली अगदी तरुण वयांतच वारले. वडिलांच्या मनाने हाय घेतली व मागून थोड्याच दिवसांत पुत्र शोकाने त्यांचाही अंत झाला. त्यांतच आणखी एका आपत्तीची भर पडली. त्यांच्या वडिलांना मिळालेले सरंजामाचे गांव सरकारने जप्त केले. हरीपंताच्या हयातीपर्यंतच ही जहागीर चालावयाची असा सरकारचा ठराव होता असे याला कारण देण्यात आले. हरीपंतांना हे पूर्वीच कळवलें होते किंवा नाही याविषयींची कांहींच माहिती लागत नाही. परंतु तें कसेंही असले तरी मागे राहिलेले कुटुंब व दोन लहान मुलें यांच्यावर आलेल्या आपत्तींत या प्रकाराने भरच पडली येवढी गोष्ट मात्र खरी. वडील चिरंजीव चिंतोपंत हे या वेळी १६।१७ वर्षांचे होते व गोपाळराव हे १२।१३ वर्षांचे होते. अशा स्थितींत घराण्याचा लौकीक संभाळून पुढे चालवावे कसे असा कुटुंबांतील माणसांस पेंच पडला. थोरले बंधू चिंतापंत हे जहागिरीसंबंधाने खटपट करण्याच्या व घरचा व्यवहार पाहण्याच्या मार्गाला लागले. गोपाळराव व त्याहनही धाकटे यांनी विद्याभ्यास चालू ठेवावा असे ठरले. गोपाळरावांना विद्याभ्यास जास्तच झटून करण्याची गरज उत्पन्न झाली. काही दिवस खटपट केल्यानंतर चिंतोपंतांना थोडेसे यश आले. जहागीर परत मिळाली नाही, पण हरीपंतांच्या कुटंबास सालीना ६०० व तिघां मुलास प्रत्येकी २०० रुपयांची नेमणूक सरकारने करून दिली. व मुलांनी सरकारची नोकरी केल्यास नोकरीच्या मुदतीत नेमणूक तात्पुरती बंद होईल असे ठरविले. या खटपटीमुळेच गोपाळरावांच्या आयुष्याला एक विशेष वळण लागले असे म्हणता येईल. नेमणुकी मिळाल्यांनी तात्पुरती गरज भागली खरी, पण त्यांत एवढी एक गोष्ट झाली की, सरकारची