पान:लोकहितवादी.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बालपणांतील काही गोष्टी. लागतां भलतीकडेच लागे हे पाहून गोपाळरावांस रहावेना. ते पुढे गेले व यांना निशाण मारतां येत नाही तर हे शिपाई कसले ! असें थोडेसें आश्चर्यानें, कदाचित् आपली वरचढ दाखविण्याच्या हेतूनें असेल त्यांनी विचारिलें. अंमलदारालाही या तरुण मुलाच्या धाडसाचे, चौकसपणाचे नवल वाटले असावे असे दिसते. तो म्हणाला, 'होय, तें खरें. बिनचूक निशाण मारणे ही गोष्ट काहीं-सोपी नाही. तुम्हांला येत असले तर तुम्ही दाखवा पाहूं मारून.' गोपाळरावांनी होय म्हटले. व लागलीच त्या शिपायापैकीच एकाची बंदूक मागून घेतली व निशाणावर नेम धरून अचूक गोळी मारली; त्यामळे तर त्या अंमलदारास विशेषच कौतूक वाटले व त्याने तुम्ही कोण वगैरे चौकशी करून गोपाळरावांना आपल्या वरिष्टाकडे नेले. तेथेही गोपाळरावांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे धिटाईने दिली. त्या वेळचे गोरे अंमलदार येथील लोकांशी मोठ्या बेताने वागत असत. इंग्रजी अंमल नवीनच होता, अजून सरकारच्या बंदोबस्ताची घडी नीट बसावयाची होती व त्यामुळे लोकांना खूष ठेवून, त्यांचे कौतूक करून व त्यांच्यांत मिळून मिसळून अंमलदार वागत. त्याप्रमाणे साहेबाने मुलाच्या धिटाईचे व निशाणबाजीचे कौतूक केले, त्याला शाबासकी दिली व त्याच्या घरी पत्र लिहून मुलगा सैन्यांत नोकरीस येत असेल तर त्याला चांगली जागा देऊ असें कळविले. पण हरीपंताच्याने मुलाला सैन्यांत पाठविण्याचा हिय्या झाला नाही व गोपाळराव घरीच राहिले. त्यांचा लौकीक शिपाईपेशामुळे व्हावयाचा नसून तो लेखक व समाजसुधारक म्हणून व्हावा असा ईश्वरी संकेत होता. अशा रीतीने गोपाळरावांचा अभ्यास चालला असता, त्यांच्या सराण्यावर एकाएकी दुःखाचा डोंगर कोसळला.त्यांचे सावत्रबंधू परशराम