पान:लोकहितवादी.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अपूर्व ज्ञानलालसा. नोकरी किंवा दुसरा व्यवसाय केल्याशिवाय चरितार्थ चालावयाचा नाहीं यामुळे कदाचित् असेल, पण एकदोन वर्षांतच गोपाळरावांची शाळा सुटली व ते पुणे येथील न्यायाधीश रा० सा० पाटणकर व मामलेदार अमृतराव आप्पाजी रानडे यांचे करीत उमेदवार म्हणून कामाची माहिती शिकण्याकरिता राहिले. तीन चार वर्मत सरकारी पत्रव्यवहार, हिशेबाची पद्धत, वगैरे गोष्टींची बरीचशी माहिती त्यांनी करून घेतली. घरी त्यांतच इंग्रजीचा अभ्यास चालू होता; पण इंग्रजी पत्रव्यवहाराची वगैरे माहिती नसल्यामुळे कचेरीत दप्तराकडे त्यांचा उपयोग होत नसे. त्यावेळी सरकारी कचेऱ्यांतून बहुतेक मराठीच असे. इंग्रजी शिकलेले लोक एकंदरीत थोडे असल्यामुळे त्यांच्यावर कामाचा भार विशेष पडे; व त्यांना त्या मानाने पगारही चांगले मिळत. आपले इंग्रजीशिवाय अडते ही गोष्ट गोपाळरावांच्या लवकरच लक्षात आली व त्यामुळे उमेदवारी सोडून वयाच्या अठराव्या वर्षी ते पुनः शाळेतबुधवारच्या इंग्रजी शाळेत जाऊ लागले. सरदारी थाटाचे लहानपणापासून वळण, वाढलेले वय, चार वर्षे शाळा सुटून व्यवहाराची लागलेली संवय, व वाढता प्रपंच या अडचणी लक्षात घेतल्या म्हणजे त्यांना न जुमानतां पुनः शाळेची पायरी चढणाऱ्या गोपाळरावांची ज्ञानलालसा फारच जबर असली पाहिजे असे म्हणणे प्राप्त आहे. असा; बुधवारच्या शाळेत गोपाळरावांनी एकंदर ३ वर्षे काढली. त्यावेळी Eisdale या नांवाचे साहेब शाळेचे हेडमास्तर होते, त्यांच्या हाताखालीं गोपाळरावांनी इतिहास व इंग्रजी या दोन विषयांचा विशेष अभ्यास केला. १८४४ साली त्यांनी स्कूलबोर्डाची शेवटची परीक्षा दिली. तीत या दोन विषयांत त्यांची फारच हुषारी दिसून आली, असा शेरा परीक्षकांनी मारलेला आहे. त्याचप्रमाणे Eisdale साहेबांनी गोपाळरावांस शाळा सोडतांना उत्तम शिफारसपत्र दिले लो....२