पान:लोकहितवादी.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

.. लोकहितवादी. त्यावेळी त्यांचा अभ्यास पुणे येथील मराठी शाळेत चालू होता. त्यांना गोळे घराण्यातील सरदार दाजीसाहेब गोळे यांची कन्या दिली होती. त्या काळाला व विशेषतः सरदार घराण्याच्या चालीरीतींना इतक्या लवकर मुलामुलींचे लग्न होणे ही गोष्ट अनुरूपच असल्यामुळे तिजविषयी येथें विशेष चर्चा करण्याचे कारण नाही. मराठी शाळेतील अभ्यास संभाळून गोपाळराव घरी इंग्रजी शिकत. मात्र घरीं, यावनी भाषेच्या पुस्तकांचा विटाळ होऊ नये म्हणून म्हणा किंवा तशाच इतर कारणाने म्हणा, परसांतील विहिरीत एक मोठा कोनाडा होता त्यांत जाऊन ते वाचीत बसत असत. इंग्रजी शाळेतून घरी परत आल्यावर अंगरखा पागोटे काढून शुचिर्भूत होऊन मग त्यांना घरांत यावे लागे. त्या वेळच्या व त्यांतल्या त्यांत विशेषतः सरदार घरण्यांतील तरूण मुलांना पोहणे, घोड्यावर बसणे, निशाण मारणे वगैरे कलांचे शिक्षण मिळणे हे अवश्यक वाटत असे. गोपाळरावांनाही असें शिक्षण मिळाले होते. लहानपणी पर्वतीच्या तळ्यांत पोहण्याची त्यांना फार हौस होती. अशा एका प्रसंगी बुडणाऱ्या एका समवयस्क सोबत्याला धाडसाने वाचविल्याची त्यांची एक गोष्ट सांगतात. त्याचप्रमाणे त्यांच्या निशाण मारण्याच्या कौशल्याचीही एक आख्यायिका आहे; ती त्यांच्या धैर्याची व समयसूचकपणाची दर्शक असल्यामुळे यथे देतो.. _* एके दिवशी सकाळच्या प्रहरी गोपाळराव संगमाच्या बाजूस फिरावयास गेले असतां तेथें एके ठिकाणी काही गोरे सोजीर निशाण मारण्याची कवाईत करीत होते, त्यांकडे त्यांचे लक्ष वेधले. शिपाई नवे असून त्यांचा अंमलदार त्यांना बंदूक धरावी कशी, नेम कसा मारावा हे शिकवीत होता. बहुतेक वेळां निशाणावर गाळी न