पान:लोकहितवादी.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३ बुद्धीचा चौकसपणा. रीतीने झटणाऱ्या लोकहितवादी गोपाळरावांचे पाय गोपाळाच्या पाळण्यांत दिसू लागले होते.

  • गोपाळरावांच्या शिक्षणाला सुरवात त्या वेळच्या रीतीप्रमाणे थोड्याशा जुन्या पद्धतीनेच झाली असेल हे काही सांगावयास पाहिजे. असे नाही. मुंज होण्यापूर्वी बालबोध व मोडी लेखनवाचन, तोंडच्या हिशोबापुरतें गणिताचे ज्ञान, या पलीकडे त्यांचे व्यावहारीक शिक्षण गेले नव्हते. पण त्याच्याच बरोबर संध्याकाळच्या मंगल वेळी देवापुढे किंवा दिव्यापुढे बसून, देवाचे श्लोक, आरत्या, त्याप्रमाणेच तिथी,वार नक्षत्रे यांची नावे वगैरे जुन्या श्रद्धाळू मंडळींच्या समजुतीप्रमाणे शिकण्याजोगत्या ज्या गोष्टी त्या त्यांना सर्व लहानपणीच शिकविल्या होत्या. मौजीबंधनानंतर संध्येच्या पाठांना सुरवात झाली.. त्या वेळची एक गोष्ट नमूद केलेली आढळते. ती महत्त्वाची म्हणून येथे दिली आहे. शिष्याची बुद्धी विशेष चलाख असल्यामुळे चारआठ दिवसांतच त्याची संध्या पाठ झाली. पण हे मंत्र कशाचे, त्यांचा उपयोग कोणता व अर्थ काय अशा शंका त्याच्या मनाला येऊ लागल्या. म्हणून पाठ चालले असतांच त्याने गुरुजींना मंत्रांचा अर्थ सांगण्याची विनंती केली. गुरुजी साधेभोळे वैदीक ब्राह्मण होते. त्यांचे वेदविद्येचें ज्ञान कर्मठपणाला पुरेसे होते व त्यांनी स्वतः कधीं मंत्रांच्या अर्थाची चौकशीही केली नव्हती. मंत्रांना अर्थ असावेत अशी त्यांना कधी शंकाही आली नसेल, तेव्हां शिप्याच्या प्रश्नाने त्यांना गोंधळल्यासारखें झालें. चार दोन दिवस आज उद्यां करून त्यांनी टाळाटाळी करून पाहिली व शिष्य पिच्छा सोडीत नाहीं असे पाहून त्याचे अध्ययन पुरे झाले आहे,आमची जरूर राहिली नाहीं असें वडिलांना कळवून रजा घेतली.

गोपाळरावांचा विवाह व्रतबंधानंतर लवकरच वर्ष दोन वर्षांत झाला.