पान:लोकहितवादी.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लोकहितवादी. विस्तीर्ण, पाणीदार डोळे, गौरवर्ण, छाती, गाल पिंढऱ्या इत्यादी अवयव भरदार असल्यामुळे लहानपणीच पाहणाऱ्याच्या मनावर त्यांची छाप पडत असे, असे सांगतात.

  • या वयापासूनच त्यांचा स्वभाव मोठा दिलदार होता. समवयस्क मुलांशी त्यांची कधी भांडणे होत नसत; इतकंच नाही, तर इतर मुलें भांडली तर त्यांची ती भांडणे मिटवण्याकडेच गोपाळरावांचा कल दिसून येई. अशाच प्रकारची एक गोष्ट त्यांच्या घरच्या कागदपत्रांत सांपडते. ती अशीः एकदां असे झाले की, शेजारची मुले खेळत असतां एकाचा चेंडू दुसऱ्या मुलाच्या अंगणांत पडला व तेथील मुलांस तो सांपडला. दुसऱ्या दिवशी पुन्हां मुले खेळावयाला जमली तेव्हां पहिल्या मुलाने आपला हरवलेला चेंडू - ओळखला व त्यावरून भांडण सुरू झाले. गोपाळ (राव ) मध्ये पडले; व त्यांनी त्या मुलांची योग्य ती समजूत घालून ज्याचा चेंडू त्याला परत देवविला. व ज्याला तो सांपडला होता त्याला आपला देऊन त्याची समजूत केली. उदाहरण लहान खरे, पण गोपाळरावही त्या मुलांतलेच एक मूल होते ही गोष्ट लक्षात घेतली म्हणजे त्याचे महत्त्व कळते.
  • त्याचप्रमाणे समवयस्क अशा मुलांत खेळतांना आपण उंच अशा ठिकाणी बसून इतरांची भांडणे तोडावयाची, व आपल्या समजतीप्रमाणे त्यांना उपदेशाच्या दोन गोष्टी सांगावयाच्या अशा प्रकारचे खेळच गोपाळराव त्या वेळीही आपल्या बालमित्रांबरोबर खेळत. मोठेपणी लोकांच्या हिताकरितां लेखन व कृती अशा दोन्ही
  • अशी खूण केलेल्या " लो• हि०च्या बालपणांतील गोष्टी रा. कृ. ना. आठल्ये यांनी लिहिलेल्या चरित्राच्या आधारे घेतल्या आहेत. हे चरित्र विस्तृत आहे व ते लवकरच प्रसिद्ध होणार आहे असे कळतें.