पान:लोकहितवादी.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लोकहितवादी. नाहीं; येविशी कोणीही अंदेशा घेऊ नये. बाजीराव साहेब यांजकडे जे चाकरीस असतील त्यांणी चाकरी सोडून आजपासून दोन महिन्यांत आपले घरीं यावें; जे कोणी न येतील त्यांची वतने जप्त होऊन खराबी झाल्याशिवाय राहणार नाही. जमीनदार यांणी आपापले परगण्यांतील जे कोणी बाजीराव साहेब यांजकडे चाकरीस असतील त्यांची याद नांवानिशीवार तूर्त समजावी. चाकरी सोडून जसजसे घरी येतील ते वेळेस समजावीत जावें. बाजीरावसाहेब यांची कुमक करूं नये; व त्यांजकडे वसूल एकंदर देऊ नये. न दिल्यास सालमजकुरीं मुलखास उपद्रव लागला आहे त्याची दर्याप्ती होऊन सूट मिळेल, बाजीरावसाहेब यांजकडे वसूल दिल्यास तो ऐवज मजुरा न देतां दरोबस्त ऐवज घेतला जाईल व जमीनदार कुमक करतील व ऐवज न देतील तर त्यांची वतने व जमीनी त्यांजकडे चालणार नाहीत. व लष्करकडे व हरएक जे कोणी मुलूख लुटतील व वाटा मारितील ते जिवानिशी गेल्याखेरीज राहणार नाहीत." ता. ११ माहे फेब्रुवारी सन १८१८ इसवी बमाजी बेहुकूम एलफिनस्टन साहेब बहादूर. याप्रमाणे राज्यांतर घडून आले. देशमुख घराण्याला हे अरिष्ट चांगलेच भोवलें, कारण या घराण्यांतील त्या वेळचे कर्ते पुरुष चितो वामन देशमूख हे पेशव्यांचे मुख्य मसलतगार होते. “ राज्यांतर होणे हैं मोठे अनिष्टाचे कारण आहे " असे लोकहितवादी यांनी एका ऐतिहासिक टिपणांत म्हटले आहे; आणि त्याचे उदाहरण म्हणून जाजीराव पुण्यांतून गेल्यानंतर झालेल्या दुःस्थितीचे वर्णन केले आहे. त्यांत ते म्हणतात-" त्या वेळेस कितीएक लोक भाऊ दातार, बापूजी नाईक, पिदडी व बापू कृपाराम परांजपे वगैरे हजारों सावकार,