पान:लोकहितवादी.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सरंजामांची दुर्दशा. सरदार, कारकून, शिलेदार, कारखानेवाले, गृहस्थ, पालखीत बसून फिरणारे, त्यांस पायांत घालावयास जोडा नाहीसा होऊन ते अन्नासही महाग झाले ! त्यांचे लाखों रुपये सरदारांच्या दौलतीवर येणें होतें, त्या दौलती बसल्या, व त्यामुळे त्यांचे सर्वस्व गेलें ! अनगळ, तांबेकर, वानवळे, गद्रे व परांजपे इत्यादि नाईक मंडळींजवळ खतें मात्र राहिली. सरदार म्हणू लागले की, 'आमच्या दौलती गेल्या. आतां जातसरंजाम मात्र राहिले आहेत. तुमचा पैसा घेऊन फौजेस घातला तो आतां आम्ही कोठून द्यावा ? बापू कृपाराम बहाणपूरकर यांचे बापू गोखल्यांकडे तीन लाख रुपये येणे होते. याचप्रमाणे दुसरे लोकांचेही देणे घेणे होते. गोखले मेले त्या दिवसापासून बापू कृपाराम याचा रोजगारच बुडाला. पुढे दौलतीचे कर्जाचा उपद्रव सरदारांस होऊ नये म्हणून त्या लोकांचे पट करून पुण्यात एक त्यांकरितां एजेंटी स्थापून असा ठराव केला की, 'त्याशिवाय दुसरे कोडताने त्यांजवर हुकुमनामे करूं नयेत.' असें ठरवून त्यांचा बचाव केला. परंतु येणेंकरून त्यांचे ऋणकरी व पदरची मंडळी यांचा तरणोपाय झाला नाहींच. देशमूख घराण्याला हे अरिष्ट जास्तच बाघलें असें वर म्हटले आहे. हेच जास्त विस्ताराने आतां सांगतो. गोपाळरावजींचे वडील हरीपंत हे अष्टयाला लढाईत बापूबरोबर असून रावबाजी बहापुराकडे पळाले त्यावेळी त्यांच्या लप्करांत होते. एल्फिन्स्टन साहेबांनी दिलेल्या दोन महिन्यांच्या मुदतीत ते इंग्रजांकडे येऊन हजर झाले नाहीत म्हणून त्यांजकडे असलेला सरंजाम जप्त झाला. बाजीराव साहेबांनी पेशवेपदावरचा आपला हक्क सोडून दिल्यावर खुद्द त्यांच्याच आग्रहावरून हरीपंत पुण्यास परत आले व तेथे त्यांचे वकील म्हणून राहिले. बाजीरावांच्याच रदबदलीने पांचचार वर्षांच्या वाटाघाटीनंतर सरंजाम हरपिंतास १८२४ साली परत मिळाला व त्याचेबरोबर मागील पांच