पान:लोकहितवादी.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एलफिस्टनचा जाहीरनामा. निकरावर आल्या.. खडकीला एकादी लहानशी चकमक झाली, आणि संकट आले आले असे म्हणणार तोपर्यंत बाजीराव पळालेसुद्धां. खुद्द राजधानीच्या शहरांत, जेथे श्रीमंतांचे दर्शन रोज हजारों लोकांस घडत असे, व नोकरी, ऋणानुबंध इत्यादी अनेक कारणांनी श्रीमंतांच्या लाग्याबांध्याची माणसे शेकडों होती, तेथें अकस्मात् घडलेल्या या प्रकाराने पुष्कळांना वाईट वाटले असेल, व आश्चर्य तर सवांनांच वाटले असेल हे खरे; पण मार्मीक रीतीने पाहणाराला तेव्हाही, झाले हे केवळ आदींच अनपेक्षीत किंवा केवळ गैरच झालें असे वाटले नाही. त्यांतूनही अल्पिष्टन साहेबांनी धोरण राखून शत्रुपक्षाच्या लोकांना संभाळून घेतले, त्यांची समजूत घातली व त्यांचे नेहमीचे व्यवहार अव्याहतपणे चालू राहतील असे आश्वासन दिले या गोष्टीमुळे तर इंग्रजी राज्याचा परकेपणा दिवसानुदिवस कमी होत चालला. राववाजीनी पुण्यातून कायमचा पाय काढल्यावर अल्पिष्टन साहेबांनी एक जाहीरनामा काढला. या जाहीरनाम्यांत वसईच्या तहानंतर रावबाजींनी इंग्रजांविरुद्ध केलेल्या कारस्थानांचा उल्लेख करून व पेशव्यांविरुद्ध इंग्रजांस शस्त्र का उचलावे लागले हे सांगून पुढील राज्यव्यवस्थेचे धोरण कसे राहील यासंबंधाने लिहितांना ते म्हणतात _" कंपनी सरकारांत मुलुख राहिले तेथें कंपनी सरकारचा अम्मल होईल, परंतु कोणाचे वतनास व इनामास व वर्षासनास व देवस्थानचे खर्चीस व खैरातीस व कोणाचे ज्ञातीचे धर्मास खलेल न होतां वाजवी असेल तसे सुरळीत चालेल व बाजीराव साहेब मक्तेदारास मामलती देत होते तें तहकूब होऊन कमावीसदार यांजकडे मामलती सांगून जो वाजवी ऐवज असेल त्याची उगवणी होईल. कोणावर जुलूम जास्ती कांहीं एक होणार