पान:लोकहितवादी.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११२ लोकहितवादी. चालले आहे व राजा कोण, त्याची वर्तणूक कशी, हे पाहात जा. माहीतगार व्हा. तुमच्या प्राचीन काळच्या विद्या, ग्रंथ, तर्क व कल्पना यांचे शंभरपट व हजारपट आतां चांगल्या विद्या व कल्पना निघालेल्या आहेत. त्या सर्व पहा. तुमचे संपत्तीवर तुम्ही लक्ष देऊन आळसांत राहू नका. भट व पंडित हे केवळ मूर्ख, हे पक्के समजा. खरी नौती कोणती ते पहा. पैसा खाऊ नका, रांडबाजी करूं नका. प्रपंच, संसार, भलाईनें करा, आपले शत्रूस देखील वाईट इच्छू नका. शरीराने व मनाने देखील पाप करूं नका. प्राणीमात्रावर दया करा. अपराध क्षमा होतील तितके करा; परंतू क्षमा न करण्याचा प्रसंग येईल तेथें क्षमा करूं नका. एकमेकांवर प्रीती करा. नित्य उठून ईश्वराचे भजन व प्रातःकाळी चिंतन करीत जा व त्याजवळ क्षमा मागा. आपले हातून पाऐं व अपराध बहूत घडतात त्यांची क्षमा भगवंताशिवाय करणार समर्थ कोणी नाही. ढोंग, सोंग करूं नका. लबाडी सर्वदा ईश्वरास दिसते. यास्तव ती कदापी करूं नका. कोणतेही पाप करूं नये, ते फार वाईट. इहलोकी क्षणभर सूख वाटेल परंतु त्याचा झाडा द्यावा लागेल. मरावयाचे आहे हे नित्य मनांत आणा. तुम्ही आपले मुलांची काळजी करून त्यांस शहाणीं करा व सर्व लोकांची काळजी करा. नित्य काही तरी सर्व देशाचे कल्याण केल्याशिवाय एक दिवस जाऊ देऊ नका. मुख्य ईश्वरभजन करण्याचा मार्गच आहे की कोणास दुःख देऊं नये व सर्व लोकांचे हित करावें. स्वदेशाचे हित इच्छावें. म्हणजे परदेशाची हानी इच्छावी असे नाही. परंतू सांप्रत आपले लोक फार वाईट अवस्थेत आहेत; सबब फार खबरदारी ठेवावी की, या लोकांचे कल्याण कसे होईल. तुम्ही आपल्यास योग्य करा, अब वाढवा, पैका मिळाला तर अब्रू वाढते. असें नाहीं. अब्रू खरेपणा व निर्मळपणा यापासून उत्पन्न होते.