पान:लोकहितवादी.pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शतपत्रांची फलश्रुती. फरून काळजीने लिहिले आहे. हे लिखितशतक कोणी बाळबोध अथवा मोडी छापून मुलांस सारखे वाचण्यास दिले तर बहूत फायदा होईल. यास्तव या ग्रंथावर 'लोकहितवादी' आपली सत्ता ठेवीत नाहींत. पाहिजे त्यांनी ही छापून प्रगट करावी. कितीएक प्राचीन काळचे लोकांस लोकहितवादींची कितीएक मतें विपरीत आहेत याविषयी विचार केला तर खात्री होईल. यापुढे काही दिवसांनी लोकहितवादी दुसऱ्या शतकास आरंभ करील; परंतु ही गोष्ट ईश्वराचे स्वाधीन आहे. मला वारंवार लोकांस इतकेंच सुचवावयाचें की, मी कांहीं व्यर्थ, मिथ्या किंवा असत्य लिहिले नाही. जे लिहिले तें यथार्थ आहे; असे मला तर खचीत वाटते. जे सारासार विचार करणारे; ज्यांची मते पंडितांसारखी कुत्सित नसून विस्तीर्ण झाली आहेत; त्यांस हे समजेल. माझी सर्व जगास एवढीच विनंती आहे की, तुम्ही सर्वजण विचार करण्यास लागा, वाचावयास लागा, नवीन ग्रंथ व वर्तमानपत्रे वाचा. तुमचे शेजारी काय होत आहे याचा विचार करा. इंग्रजांमध्ये किती एक चांगले गूण आहेत ते तुम्हांस प्राप्त व्हावे म्हणून ईश्वराने ही तुमची त्यांची संगत घातली आहे हे लक्षांत आणा. सारासार पहा. परंपरा,आंधळ्याची माळ लागली म्हणून तीच चालवू नका. धर्मशील ईश्वरतप्तर, व्हा, या गुणावांचून सर्व व्यर्थ आहे; सत्य बोला, दुष्ट वासना सोडा, धर्म सुधारणा करा, म्हणजे जुने टाकू नका, परंतू त्याचा अर्थ घ्यावयाचा तो काळ पाहून घ्या. व ईश्वरसंबंधीं जगासंबंधी ज्ञान सर्व लोकांत वृद्धिंगत करा. आळस सोडा. तुमच्यामध्ये वास्तवीक बुद्धीमान असेल त्यास पुढारी करा, त्याचे अनुमतीने चाला; सर्व लोकांची जूट असूद्या. आपसांत फूट नसावी हे ध्यानांत वागवा. विद्या अधीक होऊन तुमचे पाऊल पुढे यडू द्या. सर्व देशाची काळजी प्रत्येकजणांनी करावी. राज्य कसे