पान:लोकहितवादी.pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११३ कृपा लोभ असो द्यावा हे विनंती. विद्या केली तर त्याप्रमाणे वागणूक पाहिजे. नाही तर विद्या व्यर्थ आहे. विद्येचें सार्थक रोजगार नव्हे ज्यास विद्येचा अर्थ ठाऊक नाही, ते असे म्हणतात. परंतू फक्त पोटच भरणारी ती विद्या नव्हे. ती मजुरी आहे. विद्या म्हणजे ज्ञान जेणेकरून मनुष्य निर्मळ होतो, विचारो होतो, समर्थ होतो. उनाड जे लोक आहेत ते विद्येचें तात्पर्य द्रव्य मिळविण्याचे असे समजतात. परंतू विद्येपासून द्रव्यलाभही होतो व दुसरे अनेक लाभ होतात. याप्रमाणे तात्पर्य मी निरूपण केले. याप्रमाणे सर्वांनी चालावे आणि असे होण्यास माझे श्रम कांहीं उपयोगी पडले असे दृष्टोत्पत्तीस आल्यास माझे श्रम परिहार होतील. माझें मागणे सर्व लोकांस आहे की; मी जे लिहिले आहे त्याचा विचार करून पहा. तुमच्या चांगल्या वांचून त्या लिहिण्याचा हेतू नाही. तुमचें कल्याण व्हावे म्हणून मी झटतों व तुमच्या चुक्या वगैरे मी उघड करून दाखविण्यांत तुम्हांस रागरोष येईल हे मी मनांत आणले नाही. कारण की; माझी उत्कंठा तुमच्या सुधारण्याकडे फार आहे. माझें अंतःकरण सर्व तिकडे आहे. यास्तव मी जे लिहिले आहे त्याचा तुम्ही विचार करावा. कारण की, ज्याने तुमची सेवा एक निष्ठनें व निष्कपटपणाने केली त्यांजवर तुमची इतराजी नसावी किंबहुना तो काय बोलतो हे तरी मनन करावे. अस्तु. तुमची आमची गांठ आज दोन वर्षे सतत होती. याचा मोठा आनंद सर्वकाळ वाटेल. सर्वांनी कृपा लोभ अस द्यावा हे विनंती." -लोकहितवादी.