पान:लोकहितवादी.pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लोकहितवादी. लिहिले व ज्या काळांत लिहिले तो काळ व तो हेतू यांकडेही लक्ष पुरविले पाहिजे. त्यांच्या वाणीत थोडासा तिखटपणा होता तो कमी असता तर त्यांच्या लेखनाचा उपयोग जास्त लौकर झाला असता. परंतु एकंदरीत पाहतां 'शतपत्रांचा इत्यर्थ' म्हणून लिहिलेल्या शंभराव्या 'पत्रांत आपल्या लेखांचे ध्येय म्हणून जे त्यांनी सांगितले आहे तोच त्यांच्या सर्व लेखनाचा व चारित्र्याचा एकंदर निष्कर्ष असें मला वाटते. ते पत्र बरेच महत्त्वाचे असल्या कारणाने येथे देतो. - मी आपले श्रम या पत्रांत संपूर्ण करणार. यास्तव या पत्रशतकाविषयी काही सुचवितो. आज दोन वर्षे मी लोकांस त्यांची स्थिती-रीती कशी आहे ती अगदीं भीड न धरतां उघड करून सुचविली. त्यांत एकादें अक्षर अधिकउणे, शुद्धाशुद्ध, कोणास वाटले तर त्यांनी क्षमा करावी. माझ्या जिवाची पक्की खात्री आहे की, जो कोणी या पत्रांचे अवलोकन करील आणि विचार करून पाहील त्यास प्रत्येक शब्द खरा आहे असे वाटेल. लोकहितवादीने कोणाची मजुरी पत्करली नाही, कशाची अपेक्षा, आशा किंवा इच्छा धरली नाही. कोणाचे सांगण्यावरूच किंवा शिकवण्यावरून कृत्रिम वर्णन केले नाही. लाभावर किंवा द्रव्यावर नजर देऊन कीर्ती व्हावी या हेतूने लिहिले नाही. इतके श्रम जे केले ते फक्त लोकांस त्याची वास्तवीक स्थिती कशी आहे ती कळावी, त्यांनी सुधारावे, त्यांस इहलोकी सुखवृद्धी व्हावी, परलोकचे साधन घडावे व आपले बहुत काळापासून दृढ गृह झाले आहेत त्यांपैकी काहीं अविचाराने व कांहीं मूर्खपणाने जडलेले आहेत; ते कमी व्हावे किंवा नाहीसे व्हावें. इतक्याच हेतूनें मी यथामतीने व इच्छेनें वेतनावांचून श्रम केले आहेत व जितके लिहिले आहे ते अक्षरशहा खरें निवडून विचार