पान:लोकहितवादी.pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दयानंद स्वामाचें चरित्र. १०७ वगैरे देशांचे घेतले तर असे दिसते की, इतर देश जितका माल बाहेर पाठवितात त्यापेक्षां ज्यास्त माल विकत घेतात. कारण मजुरी, वाहतुकीचे भाडे, कमिशन, व्याज इत्यादी अनेक रूपांनी त्यांचे इतर देशांकडे असलेलें येणे अशा रीतीने वसूल होत असते. उलट हिंदुस्थानासारखे परावलंबी व कर्जबाजारी देश, सिव्हिल सर्वटांची पेनशनें, लष्करी खर्च, कर्जावरील व्याज वगैरे अनेक रूपांनी बाहेर पाठवावयाचे पैसे निर्गत मालाच्या रूपाने पाठवीत असतात. याप्रमाणेच रेल्वेसारखी परदेशी माल पाठविण्याची साधनें हवी तेवढी उपलब्ध झाल्यामुळे, यंत्रकौशल्यांत युरोपीयन लोक आपल्यापेक्षा पुढे गेलेले असल्यामुळे व आमच्या ग्रामसंस्था मोडून लहान लहान उद्योगधंदे बसल्यामुळे देशांतील दारिद्य वाढतच आहे, असे या निबंधांत प्रतिपादिले आहे. दादाभाई नवरोजी यांनी इंग्लंडातील एका सभेपुढे त्या वेळच्या सुमारास वाचलेल्या Poverty in India या निबंधाच्या आधाराने ही पत्रे लिहिली आहेत. अर्थात्च विचारांची जबाबदारी अगर श्रेय ही दोन्हीही गोपाळरावांची नव्हत. पण कठीण आणि वादग्रस्त विषय स्वतः नीट समजून घेऊन सोप्या भाषेत व्यवस्थितपणे मांडणे हे कामही काही सोपें नाहीं. 'दयानंदस्वामींचें चरित्र' हा 'लोकहितवादी' मासीक पुस्तकांतून प्रसिद्ध झालेला निबंध विषयाची मांडणी व भाषा या दोन्ही दृष्टीनी बऱ्याच वरच्या दर्जाचा आहे. गोपाळराव अहमदाबादेस असतांना तेथे दयानंदांच्या व्याख्यानांची छाप इतरांप्रमाणे यांच्यावरही पडली व तेव्हांपासून आर्यसमाजाकडे त्यांचे लक्ष लागले. त्याप्रमाणेच गोपाळरावांच्या निस्पृहीपणाचे व सालसपणाचें स्वामींना कौतुक वाटले व म्हणून स्वामींनी आपले शेवटचे मृत्युपत्र केले तेव्हां गोपाळरावांना आर्यसमाजाचे एक ट्रस्टी नेमिले होते. स्वामींच्या