पान:लोकहितवादी.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०६ लोकहितवादी. त्याचप्रमाणे पूर्वीचे बलुतेदार नाहीसे झाल्यामुळे रस्ते, गटारें, सार्वजनीक जागा, देवळे यांची गैरव्यवस्था झाली. लोकलबोर्डे असतील; पण जुने वैद्य, हकीम व पंतोजी साहजीकच गेले आणि त्यांच्या जागी मास्तर व 'डागदार' आले नाहीत. सरकार गांवचा वसूल चोपते; पण गावकऱ्यांचे हित बघत नाही. पाटलाचे न्यायमनसुब्याचे अधिकार काढून घेतल्यामुळे गांवांत क्षुल्लक मारामारी झाली तरी वेळेला जिल्ह्याच्या सेशन कोर्टापर्यंत धांवावे लागते, आणि यामुळे फिर्यादी आरोपी व विशेषतः साक्षीदार यांचे फार नुकसान होते. गांवांची स्थिती आज अशी आहे. ही सुधारावयाची असेल व गांव पुनः सुस्थितीला आणावयाचे असतील तर करांची फेरतपासणी झाली पाहिजे व विशेषतः कर वसूल करण्याच्या पद्धतींत फरक झाला पाहिजे, व ग्रामपंचायतीचे पुनरुज्जीवन केले पाहिजे." असा एकंदरीत निबंधाचा आशय आहे. दादाभाई, रानडे, दत्त, गोखले या पुढील मंडळींनी ग्रामसंस्थांच्या दुस्थितीची मीमांसा याप्रकारेच केली आहे. आज चाळीस वर्षांनंतर सरकारलाही ती पटून पुनः गांवपंचायती अस्तित्वात येऊ घातल्या आहेत. या एका गोष्टीवरूनच गोपाळरांवाचे या बाबतींतले विचार किती मार्मीक व मुद्देसूद होते हे दिसून येईल. अशाच प्रकारच्या मार्मीक आणि माहितीने भरलेल्या अशा दुसऱ्या एका निबंधाचा विषय, हिंदुस्थानास दारिद्य येण्याची कारणे असा आहे. त्यावरून जर काही अनुमान काढावयाचे असेल तर ते एवढेच की, गोपाळरावांचे मन शरीराबरोबर म्हातारें न होतां नेहमीच तरूण होते व त्यांची मतें परिस्थितीनुरूप शेवटपर्यंत उत्क्रांत होत होती. हे निबंध १८७६ साली इंदप्रकाशांत प्रसिद्ध झाले. आयात व निर्गत व्यापाराचे त्या सुमाराचे आंकडे हिंदुस्थान, इंग्लंड, कानडा