पान:लोकहितवादी.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०८ लोकहितवादी. अलौकिक विद्वत्तेबद्दल, तर्कशक्तीबद्दल व वाक्पटुत्वाबद्दल गोपाळरावांना फार आदर वाटत असे व ते त्यांना अद्वितीय पुरुष म्हणत. पुण्यांतील टवाळ मंडळींनी स्वामींची चेष्टा केल्यामुळे गोपाळरावांना विशेषच वाईट वाटे व त्यांतल्यात्यांत निबंधमालेच्या स्वयंमन्य कत्यांनी टवाळांची बाजू उचलून धरली यांत पुणेकरांनी आपल्याच मूर्खपणाचे प्रदर्शन केलें असे ते म्हणत. त्यामुळेच स्वामींवरचा हा चरित्रात्मक लेख विशेष आदरभावाने भरलेला आहे. गुजराथ, सौराष्ट्र, लंका व राजस्थान या देशांचे इतिहास व 'पृथ्वीराज चव्हाण' त्याचप्रमाणे हिंदुस्तानचा इतिहास व महंमदी धर्माची माहिती, तसेंच 'वृत्तवैभव' पत्रांत प्रसिद्ध झालेले पारशी, शीख वगैरे धर्मासंबंधी लेख व ब्रिटीश कायद्याची माहिती यांचा विचार पृथक्पणाने या ठिकाणी करता येत नाही. हे सर्व लेख अनेक प्रकारची माहिती मिळवून, सुसंगतपणाने व सरळ बाळबोध भाषेत लिहिलेले आहेत. ऐतिहासीक गोष्टींची भाषापद्धती व या ग्रंथांची भाषापद्धती यांत फरक नाही. __कचित् प्रसंगी एखाद्या विशेष मन हलवून सोडणाऱ्या, आनंदाच्या अगर दुःखाच्या विशेष प्रसंगाचे वर्णन करावयाचे असेल, किंवा सुंदर-स्थलवर्णन करावयाचे असेल तेव्हां गोपाळरावांच्या भाषेत काव्याचा ओलावा दिसतो. उदाहरण म्हणून राजस्थानाच्या इतिहासांतील कृष्णाकुमारीची हकीकत वाचावी; किंवा लंकेच्या इतिहासाच्या आरंभींच्या देशवर्णनांतील खालील उतारा पहावाः "कन्याकुमारीपासून खाली दक्षिणेकडे दृष्टी फेंकिली असतां हे द्वीप जलसमुद्रामध्ये असणाऱ्या मंदिराप्रमाणे सुंदर, मोहक व रमणीय दिसते. येथील जमीन लोण्यासारखी मृदु व पिकाऊ असून हिच्यावर किरै वृक्षांची झाडी आहे. मधून मधून उंच उंच गवत व