पान:लोकहितवादी.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ग्रामसंस्थांचे महत्त्व. १०५ क्रांत्या झाल्या तरी या ग्रामसंस्थांना काहीही धक्का लागला नाही. इंग्रजी अमलाच्या आरंभी मात्र सरकारने मुलुखाची नवीन व्यवस्था लाविली, त्यावेळी सरसहा नवीन व एकसूत्री पद्धती सुरू करण्याकरितां ग्रामसंस्थांचे अधिकार कमी केले. तेव्हापासून ग्रामसंस्थांचा व व त्याबरोबरच लोकांचा एकसारखा हास होत आहे. याच सुमारास यंत्रकला व तज्जन्य औद्योगीकक्रांती यांच्या युगाला युरोपांत सुरवात झाली व तिकडील वाढत्या उद्योगधंद्यांचा परिणाम आमच्या उद्योगधंद्यांवर विपरीत होऊन त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांची स्थिती अधिकच खालावली. आजकाल रयतेची स्थिती सुधारत आहे का बिघडत आहे, याविषयी अतिशय परस्परविरोधी अशी मते ऐकू येतात. जुन्या दृष्टीने पाहणाऱ्याला आगगाड्या झाल्या, नवीन नवीन जिन्नस येऊ लागले, पदार्थांच्या किंमती वाढल्या, यांत सुधारणा झाली असे वाटत नाही जुन्या परिस्थितीतली थांड्या गरजा आणि नियमीत पुरवठा ही स्थिती त्यांना बरी वाटते. नवीन डोळ्यांना, रोख पैसा हातांत ज्यास्त खेळू लागला, राहणीचे मान वाढले, नवीन नवीन गरजा उत्पन्न झाल्या व होत आहेत, यांतच सुधारणा दिसते. यापैकी कोणतेही मत खरे असो, गांव आणि रयत यांची आजच्या परिस्थितीत जी वास्तवीक दुर्दशा आहे तिकडे मात्र अजून कोणाचेच लक्ष गेलेले नाही. गांव मोडले किंवा मोडत चालले अशी आज वस्तुस्थिती आहे. याची कारणे-१ पूर्वीच्या काळी कर पिकाच्या मानाने घेत असत. त्यामुळे दरवर्षी पिकाची पाहणी, कराचा अनिश्चितपणा वगैरे प्रकारचा त्रास असला तरी पैसा कमी व सूट हवी तेव्हां मिळण्याचा संभव ज्यास्त. यामुळे रयतेला ती व्यवस्था जास्त सोईची होती. आज वसूल पैशाच्या रूपाने होतो. त्यामुळे गांवांत सावकार शिरला आहे.