पान:लोकहितवादी.pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०४ लोकहितवादी. निमकहराम म्हटले असते. पेशव्यांचे अंमलदार गेले न गेले तोच गांवचे लोक आम्हांकडे येऊन हजर झाले! याजकरितां आम्ही तीन दिवस वाट पाहिली; व आतां गांवांत पेशव्यांचे कोणी नाहीं तेव्हां रक्षण कोण करील.? असे समजून धन्याने आम्हास टाकिलें असा निश्चय झाला, पूर्वीचे अमलांतील सर्व लोक पळून गेले; आम्हांस आतां कोणी त्राता राहिला नाही, अशी खात्री झाल्यावर आम्ही आपणांस भेटावयास आलो. हे ऐकून साहेब खूष झाले. . ऐतिहासीक गोष्टी या पुस्तकांत कथानकाचा भागच पुष्कळ आहे. लोकहितवादींच्या मतांची छाया क्वचित् ठिकाणी गोष्टींत पडलेली दिसली तरी मुख्य हेतू जो गोष्ट चांगल्या त-हेनें सांगणें, तो बाजूला सारून मतांना फाजील महत्त्व कोठेही दिलेले नाही. अशाच प्रकारचे निबंध आणखी एक दोन आहेत, त्यांचा जातां जातां थोडा परामर्ष घेऊ. 'ग्रामरचना' (१८८३), 'स्थानीक स्वराज्य' व 'दयानंद स्वामी'वर एक चरित्रात्मक लेख ही लोकहितवादी' मासीक पुस्तकांतून प्रसिद्ध झालेली प्रकरणे, त्याचप्रमाणे ' इंदुप्रकाश', 'वृत्तवैभव' वगैरे पत्रांतून निरनिराळ्या धर्माची माहिती देणारे लेख ही अशा प्रकारच्या निबंधांची उदाहरणे होत. नमुन्याकरितां 'ग्रामरचना' हा त्यांतल्या त्यांत सरस असा निबंध विवेचनाकरितां येथे घेतो. सारांश-"अतिप्राचीन काळी हिंदुस्थानांत मोठमोठी अरण्ये होती व त्यांत मनुष्यांनी परिश्रमानें वसाहती स्थापन केल्या त्यांस क्षेत्रे म्हणत. येथून हिंदुस्थानांतील ग्रामरचनेला सुरवात झाली व अन्न, वस्त्र, पाणी व छाया या मनुष्याच्या सुखाला अवश्य असणाऱ्या गोष्टी जेथे जेथें विपुलतेने मिळाल्या त्या त्या अनुरोधानें गांव वसले व कुलकर्णीपाटील ही बलुतीं अस्तित्वात येऊन ग्रामसंस्था जन्मास आल्या. त्या १९ व्या शतकाच्या आरंभापर्यंत जीवंत होत्या. मध्ये कित्येक राज्य