पान:लोकहितवादी.pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मार्मीक उत्तर. १०३ वाज्यावर मांडिली होती. एक वादी व एक प्रतिवादी. दोघेही उघडे बोडके ! वस्नपात्र जाऊन भिकारी झालेले ! त्यांचे शेजारी वकील खोबरें खात उभे आहेत आणि वादी प्रतिवादी यांचे हातांत करवंट्या असून ते कपाळ फोडीत आहेत असे दाखविले होतें ! जे कोणी तंटे तोडण्यास साहेबांकडे येत त्यांस प्रथम 'ती चित्रे पहा' म्हणून साहेब सांगत; व 'तुम्ही आपसांत समजा, नाही तर या तसबिशेप्रमाणे वकील लोक दुर्दशा करतील, याउपर तुमची खुषी असेल तर तुम्ही लढा !' या उपदेशाचा अनुभव लक्षावधी लोकांस आलाच आहे. आता त्याची फारशी व्याख्या करावयास नको!! २ अहमदाबादचे काजीसाहेब. सन १७७९ साली रा बाचे तर्फेने इंग्रजांची फौज खंबायतास उतरली. तिने अहमदाबादेवर येऊन अहमदाबाद शहर घेतले व तेथे पंधरा दिवसपर्यंत इंग्रजी अंमल होता. पुढे आठास व डभई येथे लढाया होऊन हरीपंत फडके यांनी इंग्रजांचा मोड करून सर्व मुलूख लागलाच परत घेतला. या पंधरा दिवसांत पांच सहा दिवस जनरल गॉडर्ड यांचा मुक्काम जमालपूर दरवाज्याबाहेर होता व पेशव्यांचे सर्व अंमलदार पळून गेले होते. मग तिसरे दिवशीं गांवचे लोकांनी विचार केला की, 'आपण सर्वजण मिळून साहेबांस भेटावयास जाऊं.' मग काजीसाहेबांस पुढे करून ते भेटावयास गेले. साहेबांपडे गेले तो प्रथम साहेबांनी विचारिले की, 'आम्ही येथें तीन दिवस आहों तर तुम्ही हा दिरंग कशाकरितां केला ?' तेव्हां काजी याने में समयोचीत उत्तर दिले ते ऐकून साहेब फार खूष झाले. तें उत्तर असें होतें: काजीसाहेब म्हणाले की, 'आम्ही आजपर्यंत पेशव्यांची रयत होतो. पहिलेच दिवशी आपणांकडे आलो असतो तर आपणच आम्हांला