पान:लोकहितवादी.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०२ लोकहितवादी. १२) ही पुस्तकें त्यांतल्यात्यांत विशेष वाचनीय आहेत. भाषेच्या व गोष्टी सांगण्याच्या शैलीच्या दृष्टीने पाहिले तरीही ही पुस्तकें फारच सरस ठरतील. पहिल्या भागांतील गोष्टी विशेषतः ऐतिहासीक आहेत व त्यांचे — मराठेशाहीतील गोष्टी', 'पेशवाईतील गोष्टी' व 'होळकरशाहीतील गोष्टी' असे निरनिराळे भाग केलेले असल्यामुळे कोणतीही गोष्ट लवकर सापडणे सोपे झाले आहे. स्थळवर्णने,लोकवर्णनें ग्रंथ व ग्रंथकार, धर्मविषयक चालीरीती, उपयुक्त टिपणे, उपदेशपर टिपणे वगैरे प्रकरणे दुसऱ्या भागांत येतात. गोपाळरावांची गोष्ट सांगण्याची हातोटी वाखाणण्यासारखी आहे. त्यांच्या गोष्टींत पाल्हाळ नाही. जे सांगावयाचे असेल तें मुद्देशीरपणानें, थोडक्यांत व सरळपणाने, फांटे न फोडतां सांगावयाचें; भाषा अगदी साधी असावयाची, वाचाणाराला असे वाटले पाहिजे की, आपण गोष्ट प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून ऐकत आहोत. घटकाभर रिकामा वेळ असला, पांच मिनिटें फुरसत सांपडली, तरी कोणतीही एकदोन पाने काढून वाचावी, काही तरी नवीन माहिती मिळते, थोडीशी करमणूक होते अशा प्रकारची ही पुस्तके आहेत. एकदम आरंभापासून अखेरपर्यंत वाचीन म्हणून फायदा नाही. थोडे थोडे वाचून गोष्टी मनांत मुलं दिल्या पाहिजेत. 'क्षणे क्षणे यन्नवतामुपैति । तदेव रूपं रमणीयतायाः।' हे वर्णन त्यांना चांगले लागू पडेल. या पुस्तकांतील एकदोन गोष्टी येथे देतो. १ दिवाणी अदालतीचा देखावा. पुण्यांत कॅ० रॉबर्टसन साहेब बहादूर हे १८१७ पासून १८२७ पर्यंत कमिशनरीचे कारकीर्दीत कलेक्टर होते. परंतु त्यांजकडे सर्व कामें असत व त्यांतच दिवाणीही असे. कोडते वगैरे ही कायदे प्रसिद्ध होऊन पुढे बसली. तेव्हां त्यांनी दोन चित्रे करून दर