पान:लोकहितवादी.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माहितीची जुळवाजुळव. धंद्यांपेक्षा थोडासा जास्त सोयीचा असतो. कोर्टात निरनिराळ्या प्रकारचे खटले, त्यांतले साक्षीदार व साक्षीपुरावे, फिर्यादी आरोपी, खरेखोटे, गरीब श्रीमंत वगैरे सर्व प्रकारचे लोक येतात. वकीलापेक्षा त्यांतल्यात्यांत न्यायाधीशाला या सर्वांचे निर्विकार मनाने व त्रयस्थाच्या नात्याने निरीक्षण करण्याची संधी कार मिळते. गोपाळराव अशा प्रसंगांचा होईल तितका फायदा घेत असत. कोर्टात आपल्यापुढे आलेल्या एखाद्या माणसाकडून किंवा कागदपत्रांवरून कांहीं चमत्कारीक, मनोरंजक व ऐतिहासीक माहिती मिळण्यासारखी दिसली तर तितक्यापुरतें कोर्टाचे काम जरूर तर बाजूला ठेऊनही तेवढ्या माहितीचे लहानसें टिपण करून ते घेत असत. त्याचप्रमाणे, संभाषणांत एकादी नवीन गोष्ट कळली तर तेवढी लक्षांत वन घरी गेल्यावर तिचे टिपण करीत. इनाम कमिशनच्या कचेरीत त्यांची नेमणूक झाल्यापासून हे प्रसंग त्यांना नित्याचेच झाले होते. निरनिराळ्या जिल्ह्यांत फिरावें, इनामांची चौकशी करावी व ती करितांना त्या त्या इनामांची पूर्वीची माहिती, त्या त्या ठिकाणचे विशिष्ट रीतीरिवाज, इनामांच्या सनदांची चौकशी व त्यांच्या खरेखोटेपणाबद्दल, वहिवाटीबद्दल अनेक प्रकारचा पुरावा वगैरे तडेची माहिती त्यांच्यापुढे साहजीकच येत असे. त्याचप्रमाणे काही दिवस हायकोटांत हिंदू कायदेकानूंचें Digest तयार करण्याच्या कामाकडे त्यांची नेमणूक झाली होती. त्यावेळी हिंदंचे निरनिराळे रीतीरिवाज, त्यांच्या दानपद्धती किंवा वारसापद्धती वगैरे गोष्टीविषयी ऐकीव व धर्मग्रंथांतून महिती त्यांना मिळाली असलीच पाहिजे; वृत्तवैभव व इंदुप्रकाश या पत्रांतून १८६३ च्या समारास प्रसिद्ध झालेले लेख व ऐतिहासीक गोष्टींचे दोन भाग या ठिकाणी या माहितीचा उपयोग केलेला आहे. ऐतिहासीक गोष्टी ( भाग