पान:लोकहितवादी.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

" लोकहितवादी. स्मरणांतून जाऊं द्यावयाचा नाही हा त्यांचा जन्मस्वभावच होता अर्से म्हटले तरी चालेल. दांडगी स्मरणशक्ती, चौकसपणा, मार्मीक अवलोकन शक्ती, सारासार विचार हे सर्व ज्ञानार्जनाला अनुकूल असणारे गूण परमेश्वराने त्यांना हवे तेवढे दिले होते; व त्याजबरोबर उत्तम शरीरप्रकृती व निरलसपणा यांची जोड घालून दिली होती. त्यांच्या सभोवतालच्या जगांत होणाऱ्या घडामोडी इतक्या विलक्षण होत्या की, आंधळ्याला देखील त्यांजकड़े न पाहणे अशक्य होते. आज पेशवाई गेली, उद्यां ठगी गेली, परवां सती गेलो, शीख अफगाण बुडाले, देखतां देखतां कोणाला पोर नाही म्हणून, कोणी मूर्ख म्हणून, तर कोणी दुर्बळ म्हणून, एका मागून एक संस्थानीक बुडून जिकडे तिकडे तांबडा रंग चढला; नांवाची कां असेना; पण आजपर्यंत जीव धरून असलेली, दिल्लीची बादशायत एका क्षणांत बुडाली; इतकेच नव्हे, तर ज्या कंपनी सरकारच्या सलामतीमुळे हे सर्व मन्वंतर घडून आले तें कंपनी सरकार देखील एका कागदाच्या चिठोऱ्याबरोबर आणि लेखणीच्या फटकाऱ्याने नाहींसें झालें हा केवढा चमत्कार ! या गोष्टीच अशा होत्या की, त्यांनी मुक्यांना वाचा फोडली असती व पांगळ्यांना पर्वतांचे उल्लंघन करावयाला लाविले असते. मग गोपाळरावांसारख्या हव्यासी व चौकस माणसाला त्यांनी वेध लाविला हे आश्चर्य नव्हे.त्यांतूनही आपल्या सरकारी नोकरीच्या प्रसंगाने अनेक तन्हेची माहिती मिळविण्याचे प्रसंग गोपाळरावांना अनेक रीतींनी आले हीही एक अनुकूल गोष्ट म्हणून लक्षात ठेवावयाला हरकत नाही. मुनसफ झाल्यापासून थोडीफार फुरसद त्यांना मिळू लागली; व त्याहीपेक्षां विशेष गोष्ट म्हणजे विवीध प्रकारची माहिती मिळविण्याचे प्रसंगही अनेक येऊ लागले. वकील, न्यायाधीश यांचा पेशा अशा दृष्टीने इतर