पान:लोकहितवादी.pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९८ लोकहितवादी. उभे राहिले. भोंवतीं चाललेल्या या धार्मीक खळबळीचा परिणाम शास्त्रीबुवांवर झाला व विशेषतः नवीन धार्मीक मतप्रचारकांच्या कित्येक विचारांत व आचारांत आत्यंतिकपणाची, दुसऱ्या टोकाला जाण्याची जी प्रवृत्ती दिसून येत असे त्यामुळे या सुधारणांत कांही अर्थ नाहीं, त्या हाणून पाडल्याच पाहिजेत असे त्यांच्या मनाने घेतले. त्यांच्या मनोभावनेची ही चिकित्सा खरी असेल तर मग मात्र निबंधमालेत मिशनऱ्यांची वगैरे टर करण्याची जी प्रवृत्ती दिसते तिची उपपत्ती लागते. दयानंदांची तांबडी टोपी किंवा जोतीबाचे तांबडे पागोटे हे पाहिले म्हणजे शास्त्रीवुवा बुजत. ते स्वतः भटाभिक्षुकांवर टीका करीतच; पण लोकहितवादींनी केली म्हणजे त्यांच्यामागें दयानंद, जोतीबा, मिशनरी लपले आहेत की काय, या भीतीने गांगरून हातांत जे सांपडले त्या हत्यारानें-नव्हे, लेखणीनेंत्यांनी रावबहादुरांवर प्रहारांचा वर्षाव केला. धर्माचे कसे होणार या भीतीने गांगरून गेलेल्या मनाचे प्रतिबिंब निबंधमालेच्या रावबदुरांवरील टीकेंत किंबहुना सर्वच लेखांत स्पष्ट दिसते. शतपत्रे व स्वाध्याय हे ग्रंथ वाचीत असतां दुसरा एक विचार मनांत उभा राहतो तो असा की, अशा प्रकारचे लेख लिहावयास लागणारी विपुल माहिती व खोल विचार करण्याची संवय या गोष्टी गोपाळरावांना कशा प्राप्त झाल्या ? त्यांचे इतर लेख म्हणजे इंदुप्रकाश, वृत्तवैभव वगैरे पत्रांतून १८६३-६४च्या सुमारास प्रसिद्ध झालेल, त्याचप्रमाणे ऐतिहासीक गोष्टी व टिपणे,सुभाषितें व निरनिराळ्या विषयांवर लिहिलेले उत्तर वयांतील लेख व निरनिराळ्या ठिकाणी दिलेली व्याख्याने,ही लक्षात घेतली म्हणजे त्यांच्या माहितीच्या विपुलतेबद्दल व आणि विविधपणाबद्दल, त्याचप्रमाणे विचाराच्या माकितेबद्दल वाटणारे कौतुक खरोखरीच किती तरी जास्त वाटावयाला लागते. त्या