पान:लोकहितवादी.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लोकहितवादी व "माला"कार. त्या परिस्थितीत आपल्या मतें स्पष्टपणानें–पण वास्तवीक कठोरपणाने व उच्छंखलपणाने-“लोकहितवादी'सारख्यांच्यावर टीका करण्यांतच आपण देशकार्य करीत आहोत अशी भावना त्यांच्या मनांत उत्पन्न झाली. व टीकाविषयक निबंध हे त्या भावनेचेच दृश्यफल होय अशी त्यांची उपपत्ती लावतां येते. शास्त्रीबुवांचा भावनाप्रधान स्वभाव व तात्कालीन परिस्थिती या गोष्टी लक्षात घेतल्या असतांना लोकहितवादी, मिशनरी, जोतीबा फुले, दयानंद, या निरनिराळ्या व्यक्तींवर किंवा संस्थांवर त्यांनी जी टीका केली आहे तिची उपपत्ती थोड्याशा निराळ्या दृष्टीने अशीही करता येईल. सन १८५८ सालच्या जाहिरनाम्याप्रमाणे लोकांच्या धर्मसमजुतींत आपण हात घालणार नाही असे वचन इंग्रज सरकारने दिले. याचा एक परिणाम असा झाला की; जुन्या धर्मसमजुतींत ज्यांना तथ्य वाटत नव्हते अशा मंडळींना आपल्या धार्मीक आकांक्षांना मूर्तस्वरूप देण्याची संधी मिळाली. व ब्रह्मसमाज, आर्यसमाज, प्रार्थनासमाज, अशा प्रकारच्या धार्मीक चळवळी उदयाला आल्या. स्वातंत्र्य मिळाले तेव्हां परकीय धर्मप्रसारकांनीही त्याचा फायदा घेतलाच. अंशतः राजाश्रयाच्या जोरावर, आपली संस्कृती हिंदू संस्कृतोपेक्षा उच्च आहे या भावनेनें, व अंशतः पाश्चात्य शिक्षण देण्याकरितां म्हणून या देशांत मिशनरी शिरले. व मोठमोठ्या शहरी शाळा, व्याख्याने, अशा अनेक रूपांनी त्यांच्या चळवळीला सुरवात झाली. हिंदू लोक धर्माच्या बाबतीत कडवे नाहीत. त्यांची धर्मश्रद्धा कर्मठपणामुळे मलीन झालेली असली तरी ती खोल आहे. त्यामुळे आपल्यांतील शिकलेली मंडळी धर्मसुधारणेच्या, जुने बुडविण्याच्या, मागाला लागल्याबरोबर प्रतिक्रिया आपोआपच सुरू झाली व विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्यासारखे जुन्याचे कट्टे कैवारी लो....७