Jump to content

पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/३९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३८८ : शतपत्रे

पृष्ठ ११६: शहाणे पुरुष एलफिन्स्टनसाहेबाप्रमाणे
 एलफिन्स्टन- माऊन्ट स्टुअर्ट एलफिन्स्टन (१७७९- १८५९) पेशव्यांच्या दरबारचा रेसिडेंट. दक्षिणेचा कमिशनर. मुंबईचा गव्हर्नर (१८१९- १८२७). हा अतिशय बुद्धिमान, धूर्त व धोरणी अधिकारी होता. 'Report on the Conquered Territories ofl the Peshwas' हा त्याचा अहवाल वाचनीय आहे.
 हेस्टिंग्ज- मार्क्विस ऑफ हेस्टिंग्ज (१७५४- १८२६) १८१३-१८२३ या काळातील हिंदुस्थानचा गव्हर्नर जनरल. पेशवाईचा शेवट याच्या कारकीर्दीत झाला.

पृष्ठ ११६: कोर्ट डैरेक्टर गवरनरादिक
 कोर्ट डैरेक्टर- ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालक मंडळाचे सभासद धोरण ठरविण्याचे व नेमणुका करण्याचे अधिकार यास होते.
 गव्हर्नर- हिंदुस्थानातील प्रमुख प्रांतांचे अधिकारी. मुंबई, कलकत्ता व मद्रास या तीन ठिकाणी हे होते. १७७३ साली रेग्युलेटिंग ॲक्टान्वये गव्हर्नरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कलकत्त्यास गव्हर्नर जनरलची योजना करण्यात आली.

पृष्ठ १२३: ग्रंथ करणाऱ्यास खप नाही
 इंग्रजांच्या अमदानीत सुरुवातीस नवी छापील पुस्तके लोक हाती धरण्यास तयार होत नसत. छापील ग्रंथ हा चरबीयुक्त शाईने छापलेला, तो हातात धरणे म्हणजे भ्रष्टाचार अशी समजूत याच्या मुळाशी असे. यामुळेच पुस्तके खपत नसत. हरि केशवजी यांचे एक पुस्तक ७ हजार रुपये खर्च करून छापले; पण त्याची एकही प्रत खपली नाही अशी नोंद 'Selection from Educational Record' मध्ये मिळते. (ग्रंथ खपावे यासाठी तुपाच्या शाईत ते छापण्याचा व शाई शुद्ध आहे, असा निर्देश करण्याचा प्रयोग काही मंडळींना यामुळेच करावा लागला. या प्रयोगातून निर्माण झालेले एक 'तुपातले गुरुचरित्र' प्रसिद्ध आहे.)

पृष्ठ १२६: जसे पारशी लोक... विद्यावृद्धीचे उदाहरण
 पाश्चात्त्य विद्येचे महत्त्व पारशी लोकांनी फार लवकर ओळखले आणि नव्या विद्या आत्मसात करण्यास त्वरित प्रारंभ गेला. एलफिन्स्टन, इन्स्टिट्यूशन, ग्रांट वैद्यकीय शाळा यांसारख्या शैक्षणिक संस्थांतून पारशी लोकांनी मोठ्या संख्येने आधुनिक शिक्षण घेतले. यामुळे त्यांची दृष्टी व्यापक झाली, अंगी