Jump to content

पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/३९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३८६ : शतपत्रे

कोतवालाला बाजीरावाने लोकांच्याच स्वाधीन केले व वाटेल ते शासन करण्यास मोकळीक दिली, असे इतिहासावरून समजते. घाशीरामाला लोकांनी हालहाल करून मारले अशी इतिहासाची साक्ष आहे. खुद्द बाजीरावाने विठोजी होळकरास हत्तीच्या पायाखाली मारले, हे ऐतिहासिक सत्य आहे. (अधिक माहितीसाठी 'महाराष्ट्राची सामाजिक पुनर्घटना' हे डॉ. रा. शं. वाळिंबे यांचे पुस्तक पहा. पृष्ठे १७, १८, २०)

पृष्ठ ७०: बाजीराव पेशवे यांचे अपराध
 कमालीची भोगलोलुपता हेच दुसऱ्या बाजीरावाच्या वृत्तीतील महत्त्वाचे वैशिष्ट्य होते. बायकांच्या मेळाव्यात घुटमळत राहणे हेच त्याच्या जीवनाचे सार होते. आपल्या सुखात कसलाही व्यत्यय येऊ नये, यासाठीच त्याचा सतत आटापिटा चाललेला असावयाचा, त्याच्या सुखाच्या आड कोणी आले तर त्याच्या मनात नेहमी दंश राहत असे आणि त्याचे तळपट करण्याच्या बाबतीत वाटेल ते कृत्य करण्यास त्याला दिक्कत वाटत नसे. १८०१ साली माधवराव रास्त्यांना विश्वासघाताने अटक करून त्याने रायगड येथे डांबून ठेवले, यावरून हेच दिसते. बाजीरावाचे चारित्र्य हे असले असल्यामुळे राज्याचा बंदोबस्त, न्यायदान, शिक्षण या बाबतीत त्याचे पूर्ण दुर्लक्ष झाले.

पृष्ठ ७३: पूर्वी इंग्रज.. याहूनही मूर्ख होते
 रोमनांच्या अंमलात, इसवी सनाच्या पाचव्या शतकापर्यंत, इंग्रज लोक रानटी अवस्थेतच होते. रोमनांच्या पकडीतून मोकळीक मिळेपर्यंत इंग्लंड संस्कृतीच्या अगदी खालच्या पायरीवर होते.

पृष्ठ ७४: हिंदुस्थानातील लोक दोन हजार वर्षांपूर्वी मोठे पराक्रमी होते
 लोकहितवादींच्या एकूण लिखाणातील सुरावरून असे वाटते की, फार वर्षांपूर्वी हिंदुस्थानातील लोक मोठे पराक्रमी होते, असे त्यांना तेथे सुचवावयाचे असावे; पण १०व्या शतकाच्या अखेरीपर्यंतही हिंदुस्थानातील लोक पराक्रम करीत होते. गुप्तांच्या अमदानीत सुवर्णयुग निर्माण झाले होते. राजकारण, अर्थकारण, शास्त्र, साहित्य, कला अशा अनेक क्षेत्रांत मानवी प्रज्ञेचे व प्रतिभेचे मुक्त आविष्कार सतत होत होते, हे ऐतिहासिक सत्य आहे. अर्थात् हे लोकहितवादींसारख्या इतिहासाच्या व्यासंगी व्यक्तीला विदित नसेल असे म्हणता येणार नाही, तथापि उपरिनिर्दिष्ट विधानातील 'दोन हजार' या शब्दांवरून