पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५४ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

 ब्रिटन हे राष्ट्र सर्वात जास्त शाहणे आहे. तेथील लोक विवेकी आहेत. त्यांना व्यक्तिस्वातंत्र्याचे महत्त्वहि कळतें आणि मर्यादाहि कळतात. त्यांनी १९५५ साली कायदा करून हॉरर कॉमिक्स बंद करून टाकलों; आणि असले स्वातंत्र्य अनर्थकारक आहे असे सांगून हें केलें. या कॉमिक्स विरुद्ध चळवळ चालू होती त्या वेळी ऑक्टोबर १९५४ मध्ये डेली एक्सप्रेस ने लिहिले होते की, 'मुद्रणस्वातंत्र्याचे आम्ही कट्टे पुरस्कर्ते आहों. पण आज त्यावर मर्यादा घालण्याचे आम्ही समर्थन करतों, त्याचें कारण हीं कॉमिक्स.' हॉरर कॉमिक्सच्या विरुद्ध जी ब्रिटनमध्ये चळवळ झाली ती सर्व प्रामुख्याने शिक्षकांनी केली. प्रकाशकांनी त्यांना नानाप्रकारें विरोध केला, पण शेवटों विवेकाचा जय झाला. स्वातंत्र्य व स्वैरता यांतील भेद त्या राष्ट्राला उमगला व त्याने बालकांचा हा महारोग नष्ट केला. ब्रिटनमध्ये विवेकबुद्धि अशी प्रबल आहे म्हणूनच तेथील लोकशाही निर्भय आहे. अमेरिकेतील शास्त्रज्ञांनीच तुलना करून हें दाखवून दिले आहे. फिलाडेल्फिया नगरींत १९५१ मध्ये १०० खून झाले. शिकागो नगरीत २०० झाले. त्याच साली लंडनमध्ये फक्त २१ झाले. हें सांगून थिओडोर ब्लेच म्हणतात, गेलीं २५ वर्षे लंडनची सरासरी हीच आहे, याचें कारण इंग्लिश न्यायपद्धति. तेथे गुन्ह्याला शिक्षा इतकी निश्चित आहे की, २१ पैकी ११ गुन्हेगारांनी आत्महत्या केली, ६ जणांना शिक्षा झाली, ३ वेड्यांच्या इस्पितळांत गेले व एक निर्दोष सुटला. (चॅलेंज टु डेमॉक्रसी, पृ. ५५८). एका अमेरिकनाने अप्रत्यक्षपणे स्वतःच्या देशावर ही केवढी विदारक टीका केली आहे. वार्नेस यांनी आपल्या ग्रंथांत इंग्लंडची अशीच प्रशंसा केली आहे. अमेरिकन बँका धडाधड कोसळतात, त्यांची दिवाळी निघतात. इंग्लंडमध्ये कित्येक दशकांत एकाहि बँकेचें दिवाळे निघालेले नाही. याचें कारण असें की, 'तेथले लोक कायद्याचे निष्ठेने पालन करतात. तेथे लोकमत जास्त प्रभावी आहे. सट्टेबाजीचा मोह तेथे इतका नाही' (सोसायटी इन् ट्रॅन्झिशन, पृ. ७४०). ब्रिटनमध्ये धनलोभ नाही असें नाही, राजकारण नाही असें नाही. सर्व विकार, सर्व विकृति आहेत. पण समाजहितासाठी त्यांना मर्यादा घालणें अवश्य आहे, संयम, निग्रह यानेच समाज जगतो, हा विवेक तेथे जागरूक आहे. अमेरिकेत ही विवेकशक्ति कमी होत चालली आहे. म्हणूनच