पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४० : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

याप्रमाणे काम करतो. यावरून तेथील जीवनमानाची कल्पना येईल. अजून पुष्कळशी सुधारणा व्हावयास पाहिजे असें सांगतांना लेखक म्हणतात की, अजून अमेरिकेत शे. १३ कुटुंबांचें वार्षिक उत्पन्न ५००० रु. पेक्षा कमी आहे, ही चिंतनीय गोष्ट आहे. यावरून शे. ८७ कुटुंबांचे उत्पन्न ५००० रु. च्या वर आहे एवढे निश्चित झालें. दुसऱ्या महायुद्धाच्या आधीच अमेरिकन कामगारांची शक्ति ब्रिटिश कामगारांच्या दुप्पट, जर्मनांच्या तिप्पट व इटालियनांच्या चौपट होती. त्यानंतर गेल्या बारा वर्षांत अमेरिकेचें राष्ट्रीय उत्पन्नच तिपटीने वाढले आहे. त्यांतील सर्व धन कामगारांना मिळत नसले तरी तेथील कारखानदारीवर सरकारने जीं नियंत्रणें घातलों आहेत आणि संपत्तीच्या वांटणीचे जे कायदे केले आहेत ते पाहतां अमेरिकेत लोकशाहीला विघातक अशी आर्थिक विषमता यापुढे कधीच निर्माण होऊ शकणार नाही यांत शंका नाही.
 वर्णविषमता हाहि अमेरिकेत आर्थिक विषमतेइतकाच बिकट प्रश्न होता. अमेरिकेत १८ कोटि लोकसंख्येपैकी जवळ जवळ दोन कोटि लोक निग्रो आहेत. या जातीचा गेल्या शतकांत केवढा भयंकर छळ होत असे हे जगजाहीर आहे; आणि काळ्या व गोऱ्या समाजांतील हें हाडवैर असेंच तीव्र स्वरूपांत आजपर्यंत राहिलें असतें तर अमेरिकन समाज दुभंगण्याचा बराच संभव निर्माण झाला असता. मध्यंतरी झालेल्या लिट्ल रॉक येथील शाळेच्या प्रकरणावरून हें वर्णवैषम्य अमेरिकेत तसेंच कायम आहे असा सर्व जगाचा समज झाला होता. अमेरिकेच्या हितशत्रूंनी पराचा कावळा करून त्या देशाची शक्य तितकी बदनामी करण्याचाहि प्रयत्न केला होता. पण याच सुमारास अमेरिकेचे कामगारमंत्री जेम्स मिचेल यांनी एक लेख लिहून या वर्ण विषमतेच्या क्षेत्रांतहि शांतपणे केवढी क्रांति झाली आहे, होत आहे याची माहिती दिली आहे. त्यावरून हीहि विकट समस्या अमेरिकन समाज लवकरच सोडवील असें दिसतें. आज अमेरिकेत ७ ते १३ वयाच्या शे. ९८ निग्रो मुलांमुलींना गोऱ्या लोकांप्रमाणेच शिक्षण मोफत मिळते. ४८ पैकी ३२ संस्थानांत विभक्त शाळा मुळीच नाहीत, आणि तेथे कधी बखेडेहि माजले नाहीत. १९३० साली २७ हजार निग्रो तरुण विद्यार्थी कॉलेजचें शिक्षण घेत होते. आज ही संख्या दोन लाखांच्या