पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/२३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण सातवें : २२५

स्वीकारावयाचा ? 'धर्मो रक्षति रक्षितः।' हें कविवचन आपण ध्यानांत ठेवले पाहिजे. 'बले धर्मः प्रतिष्ठितः।' श्रेष्ठ धर्माचें श्रेष्ठ मूल्यांचें रक्षण श्रेष्ठ बलाने, श्रेष्ठ युद्धसामर्थ्यानेच होत असतें, हें आपण विसरता कामा नये. दुर्दैवाने त्याचाच आपल्याला विसर पडलेला आहे. या भ्रान्तींतून बाहेर पडून आपण राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकारणांत रोख व वास्तववादी वृत्ति धारण केली नाही तर दण्डसत्तांचे आव्हान स्वीकारणें आपल्याला कधीहि शक्य होणार नाही.

+ + +


 लो. १५