पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

८ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

कार्यक्षमता जास्त आहे असें मत दिलें. त्याचप्रमाणे या बाबतीत ब्रिटिशांशीं स्पर्धा करून सोव्हिएट सरकार बिटिशांपेक्षा स्वस्त भावांत पोलाद निर्यात करूं शकेल हि त्यांनी मान्य केलें, याचें कारण म्हणजे ब्रिटनपेक्षा सोव्हिएट मजुरीचे दर फार स्वस्त आहेत हे होय. नेव्हिन बीन या अमेरिकन इंजिनियरानेहि सोव्हिएट कारखानदारीविषयी असेंच मत दिलें आहे, आणि म्हणून त्याचा आपण गंभीरपणे विचार केला पाहिजे असें स्वबांधवांना सांगितलें आहे.
 ही सर्व माहिती देऊन लेखक श्री. ॲलसॉप म्हणतात की, सोव्हिएट रशियाची ही प्रगति नैतिक दृष्टीने अगदी हिडीस अशी आहे. व्यक्तिस्वातंत्र्य व व्यक्तिसुख या दृष्टीने आपण उद्योग करतों तर लष्करी बळाची वाढ हे एकच उद्दिष्ट रशियापुढे आहे. अमेरिकेचें भांडवल बव्हंशी जीवनोपयोगी वस्तूंवर, सुखसोयींच्या वस्तूंवर खर्च होतें, तर रशियाचें भांडवल बव्हंशीं औद्योगिक व लष्करी उत्पादनावर खर्च होतें. पण नैतिक-अनैतिक हा प्रश्न बाजूला ठेवून त्यांतील कठोर सत्याला तोंड देण्याची सिद्धता आपण केली पाहिजे असें त्यांनी शेवटीं बजावलें आहे (रीडर्स डायजेस्ट-सप्टें. १९५६).

विज्ञान - शिक्षण

 औद्योगिक धन व लष्करी साहित्य याच्या निर्मितीसाठी शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, इंजिनिअर, यांची किती गरज असते हें सांगण्याची आवश्यकता नाही. आरंभी रशियाला परकी तज्ज्ञांच्या साहाय्यावर अवलंबून राहावें लागत असे. पण तेव्हापासूनच सर्व जगामध्ये आपलें युद्धसामर्थ्य श्रेष्ठ ठरलें पाहिजे हें उद्दिष्ट रशियन प्रशासकांच्या डोळयांपुढे होतें, आणि त्या दृष्टीने त्यांनी रशियन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची योजना आखली होती.
 जॉन गुंथूर यांनी रशियांतील शास्त्रीय शिक्षणाविषयी आपल्या ग्रंथांत ('इन्साइड् रशिया टुडे') सविस्तर माहिती दिली आहे. ती देतांना त्यांनी रशियांतील शिक्षण म्हणजे पश्चिमेला एक आव्हानच आहे असें म्हटले आहे. सध्या या विषयावर लिहिणारे बहुतेक सर्व पाश्चात्त्य लेखक विल्यम लॉरेन्स, जेम्स मिचेनेर, अलेक्झँडर, सेव्हरस्की, पॉल पामर- आव्हान, रशियाचें पश्चिमेला आव्हान- हीच भाषा वापरतात. कारण लष्करी