पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण पांचवें : १६३

 चीनच्या दण्डसत्तेने आपल्या लोकसत्तेला जें आव्हान दिले आहे त्याला प्रत्युत्तर द्यावयास भारत समर्थ व्हावा अशी आपली इच्छा असेल तर काँग्रेसप्रणीत वरील अधम तत्त्वज्ञान आपण सोडलें पाहिजे, भारतांतून नष्ट केले पाहिजे. आणि भारताचा राष्ट्रीय स्वार्थ हे एकच उद्दिष्ट आपल्या डोळयांपुढे आपण ठेवलें पाहिजे. भारताच्या जनतेचें जें कल्याण, तिचा ज्यांत ऐहिक उत्कर्ष, तिची जी भौतिक प्रगति, ती साधण्यासाठी जें करावें लागेल तेंच सत्य, तीच अहिंसा, तोच धर्म ही आपली दृष्टि असली पाहिजे. विश्वबंधुत्व, मानवता, पंचशील हीं तत्वें वंद्य आहेत, पण भारताच्या हिताच्या आड तीं येत असतील तर त्यांचा त्याग आपण केला पाहिजे. आपला स्वार्थ साधल्यानंतर त्या थोर तत्त्वांसाठी प्रत्येक राष्ट्राने कांही प्रयत्न करावे हे योग्यच आहे. पण सध्या निरपेक्षपणे त्यांची उपासना चालली असल्यामुळे भारतावर मोठी संकटपरंपरा कोसळत आहे. 'पंचशीलाचा जन्म पापांत झाला आहे' अशी जी कटु टीका आचार्य कृपलानी यांनी केली ती याच अर्थाने चौ एन् लाय वाटाघाटीसाठी येणार असें ठरल्यानंतर भारतीय संसदेतील सभासदांना एक भीति वाटू लागली. ती अशी की, आपले पंतप्रधान चीनने व्यापलेला प्रदेश कदाचित् त्याला देण्याचें मान्य करतील, आणि त्यामुळे लोकसभेत 'भारताचा तसुभरहि प्रांत चीनला देणार नाही', असें आश्वासन त्यांनी मागितलें. याचा अर्थ फार भयंकर आहे. राष्ट्रहितापेक्षा परक्यांना न्याय देण्यांत आपले नेते धन्यता मानतात, राष्ट्रीय स्वार्थ हें त्यांचें एकमेव लक्ष्य नसून कांही अंतिम निरपेक्ष सत्याचे ते उपासक आहेत अशी जनतेला भोति वाटू लागली आहे, असा त्याचा अर्थ आहे. आणि आतापर्यंत हेंच घडत आल्यामुळे लोकांना तसे वाटणें स्वाभाविक आहे. स्वयंनिर्णयाच्या उदात्त तत्त्वान्वये आपण पाकिस्तान देऊन टाकले. सार्वमताच्या तत्वासाठी काश्मीरचा प्रश्न नासून टाकला. तिबेट हा स्वायत्त प्रदेश आहे असे आपले मत असूनहि १९५४ च्या एप्रिल- मध्ये झालेल्या हिंद-चीन करारांत तिबेट हा चीनचा भाग आहे हे आपण मान्य केलें, आणि मग थोर न्यायबुद्धीने ल्हासाला जाणाऱ्या व्यापारी मार्गावर आपलीं जीं लष्करी ठाणीं होतीं व आपले पोस्ट व तार खातें यांच्या संरक्षणासाठी ज्या सैन्याच्या तुकड्या होत्या त्या आपण काढून