पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण पांचवें : १४७

कोणी भ्रांत किंवा भूढ ठरविलें नाही. त्यामुळे त्या समाजाच्या भावना दुखविल्या जातील हें काँग्रेसच्या नेत्यांना निश्चित माहीत आहे. पण तशाच भावना हिंदूंनाहि आहेत हें त्यांनी कधी जाणलें नाही. त्यामुळे इतर समाजांत भारतनिष्ठेचे बीजारोपण करण्याचे प्रयत्न करण्याऐवजी हिंदू- विरुद्ध मुस्लिमांची बाजू घेण्यांत त्यांनी भूषण मानले. यांत अधःपात सगळ्यांचाच झाला. मुस्लिमांचा धर्म निराळा असला तरी या भूमीच्या प्राचीन पराक्रमी पुरुषांचेच ते खरे वारस आहेत. त्यांचे भरणपोषण सर्व या भूमीनेच केलें आहे. तेव्हा तिच्या प्राचीन वैभवाच्या अभिमानानेच त्यांची उन्नति होईल. इतर देशांतल्या मुस्लिमांनी हें जाणलें आहे. ईजिप्तच्या राष्ट्रसभेचे चिटणीस हमीद् अल् अलेली १९१० सालच्या आपल्या भाषणांत म्हणतात, "ज्यांनी पिरामिड उभारले, युरोपचें अस्तित्वहि नव्हतें तेव्हा ज्यांनी संस्कृति निर्माण करून तिचा प्रसार केला त्यांचे कर्तृत्व, त्यांची प्रज्ञा आमच्या रक्तांत आहे." हिंदुस्थानांतील अनेक मुस्लिम पंडितांनीहि याच तऱ्हेचा उपदेश आपल्या बांधवांना केला आहे. ('भारतीय लोकसत्ता' या ग्रंथांत या विषयाचें विस्तृत विवेचन मीं केलें आहे. जिज्ञासूंनी तें पाहावें. पृष्ठ ४०२- ४१२) अशा अभिमानानेच समाजाच्या अंगीं कर्तृत्वाचा उदय होतो. त्याला पराक्रम शक्य होतो. येथला मुस्लिम समाज भारताच्या बाहेरच्या मुस्लिमांच्या पराक्रमाचा वारसा अर्थातच सांगू शकत नाही. येथले ख्रिस्ती आम्ही नेपोलियन, वॉशिंग्टन, न्यूटन यांचे वारस आहों, असें म्हणूं लागले तर तें हास्यास्पद होईल; आणि फ्रेंच किंवा इंग्लिश लोक त्या तत्त्वावर त्यांना कधीहि जवळ करणार नाहीत. ते ख्रिस्ती असले तरी भरत- भूमीच्या प्राचीन पराक्रमाचे- रामकृष्णांचेच ते वारस होत. त्याचप्रमाणे मुस्लिमांचें आहे. ज्या भूमींत आपण राहतो तिच्या या वैभवाचा अभिमान जो समाज धरीत नाही त्याची उन्नति होत नाही. हें ध्यानीं घेऊन काँग्रेसने तसा अभिमान बाळगणाऱ्या राष्ट्रनिष्ठ मुस्लिमांनाच जवळ करावयास हवें होतें, पण तें न करतां मुस्लिमांनी काँग्रेसमध्ये यावें म्हणून देवाण-घेवाणीच्या बाजारी तत्त्वावर ऐक्य करण्याचे तिने प्रयत्न केले. कायदेमंडळांतील जागांचा व मंत्रिपदाचा सौदा करून लीगला वश करण्याचें धोरण तिने आखलें. त्यामुळेच भारताचा नाश झाला. राष्ट्रीय अहंकाराच्या जाणिवेतून त्यागाची