पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण चौथें : १०७

करावी असें धर्मानुज जो भीम त्याला वाटलें की, ज्या मातींतून आपला देह निर्माण झाला त्या मातीशीं तो संपर्क करीत असे. तिच्यामध्ये आपला देह घोळवीत असे. काँग्रेसने हें करावें अशी पंडित जवाहरलालजींची इच्छा आहे. कारण काँग्रेस तेथून निर्माण झाली आहे हें त्यांनी डोळयांनी पाहिलें आहे. पण काँग्रेसजनांत ही वृत्ति नाही. कारण त्यांच्यांत उत्साह, तळमळ, आस्था यांचा अभाव आहे. कार्याविषयी उत्साहच जेथे नाही तेथे कार्यक्षमता कोठून येणार?

मूल्यमापन

 आपले सरकार आपण हाती घेतलेल्या योजनांचे दरसाल मूल्यमापन करीत असतें आणि त्या मूल्यमापनाचीं इतिवृत्तं दरसाल प्रसिद्ध होत असतात. मे १९५८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या पांचव्या मूल्यमापनाचें (रिपोर्ट ऑफ दि फिफ्थ इव्हॅल्युएशन कमिटी) वृत्त पाहा. मूल्यमापक अधिकारी सांगतात की, त्यांनी एकंदर ८२ विभाग (ब्लॉक) तपासले. प्रत्येक विभागाला एक नियंता अधिकारी (ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर) असतो. या ८२ नियंत्यांची त्यांनी मुलाखत घेतली. यांतील बहुतेक दुसऱ्या कोठल्या तरी सरकारी खात्यांतून बदलून आलेले होते. मूल्यमापक अधिकाऱ्यांनी त्या सर्वांना विचारलें की, हें काम तुम्हांला दिलें यांत तुम्हांला बढती वाटते कीं शिक्षा वाटते ? २३ नियंत्यांनी सांगितले की, आम्हांला हे काम नको आहे. परत पहिल्या जागी पाठविलें तर बरे होईल. ३२ जणांना ही बढती वाटत नाही. हे काम नको आहे असें नाही. पण एकंदर परिस्थिति सुखाची नाही म्हणून ते असंतुष्ट आहेत. या ८२ जणांत राजकीय वा सामाजिक कार्यकर्ता एकहि नव्हता. आता या इतिवृत्ताचा अर्थ किती वाईट आहे ते वाचकांच्या सहज ध्यानात येईल. आपल्या खेड्यांची संख्या सुमारे ५ लाख आहे. शंभर खेड्यांचा एक विभाग साधारणपणे असतो. एवढ्यांना ५००० नियंते पाहिजेत. पण ते समर्थ रामदासांच्या महंतासारखे पाहिजेत. कार्याला वाहून घेणारे पाहिजेत. अहोरात्र त्याची चिंता वाहणारे पाहिजेत. ध्यानी-मनीं- स्वप्नी त्यांना समाजविकास योजना दिसली पाहिजे. त्यामुळे निर्माण होणाच्या भावी भारताची चित्रे त्यांच्या डोळ्यापुढे तरळली पाहिजेत. म्हणजेच ते ध्येयनिष्ठ