Jump to content

पान:लोकमित्र १८९५.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५३ )

जारा नामक काव्यांत शिवाबावनी नांवाचे एक वेगळेंच प्रकरण घालून त्यांतही त्याने शिवाजीच्या अतुल पराक्र- माचें वर्णन केले आहे. त्यांतील पद्ये वाचून शिवाजीमहा- राज आणि त्यांचा गुणवान् स्तुतिपाठक भूषणकवि या उभयतांच्या संबंधानें अत्यंत आदरबुद्धि उत्पन्न होते शिवाजीचा अवतार जर न होता, तर हिंदुस्थान देशावर कसकसे अनर्थ ओढवले असते याचें वर्णन करितांना भूषण कवीनें एके ठिकाणी झटलें आहे :-

कासी की कला जाती, मथुरा मसीद होती, ॥
शिवाजी न होता तो सुंत होत सबकी ॥ १ ॥

अक्षरशः खरें आहे! खरोखरच शिवाजीचा अवतार जर न होता, तर हिंदूंच्या सुंता होऊन त्यांस मुसलमान व्हावें लागतें. आणि येथेंत्र आह्मी असें ह्मणून ठेवत कीं, भूषणकवीचा जर अवतार झाला नसता तर शिवाजी- च्या सोज्वळ यशाचे इतके गोड वर्णन दुसऱ्या कोण- त्याही कवीच्या हातून झालें नसतें !
 भूषणकवि जेव्हां दिल्ली सोडून दक्षिणेत आला, तेव्हां जो राजा खरोखरीच यवनांचा द्वेष्टा असेल त्याचा आश्र- य करावयाचा असा त्याच्या मनाचा पक्का निश्चय झालेला होता. इकडे छत्रपतीनीं तर यवनांचा उच्छेद करण्याकरितां जणूं काय आपल्या हातांत वीरकंकणच बांधले होते. मग काय विचारतां ! भूषणकवीस शिवाजीचें दर्श- न होतांच उभयतांच्या विचारांची एकरूपता होऊन जें त्यांचें परस्परांवर प्रेम जडलें तें अव्याहत तसेंच कायम

राहिलें. शिवाजीच्या संबंधानें भूषण कवीच्या मनांत