Jump to content

पान:लोकमित्र १८९५.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५२)

पहाडांत कोणीएक हिंदु राजा राज्य करीत होता, त्याज- कडे गेला; आणि मोठ्या चातुर्यानें त्यानें त्या राजाची प्रीति संपादन केली. त्या राजानेही भूषण कवीचा चांगला सत्कार करून त्यास एक लक्ष रुपये दक्षिणा दिली व

मोठ्या आदराने त्यास परत घरी जाण्याची परवानगी दिली.

 परंतु घरीं जाण्यास निरोप देतेवेळीं तो राजा मोठ्या गर्वानें भूषणकवीस ह्मणाला, "असा दाता पृथ्वीवर दुस- राः कोण आहे ?" भूषणकवीस ही त्या राजाची गर्वोकि यत्किंचित्देखील सहन न होऊन त्यानें उत्तर केलें, "पृथ्वीच्या पाठीवर असे दाते शतंभीष्म पडले आहेत. परंतु, असा याचक मात्र तुझीं कर्मों पाहिला नसेल की, गर्वोक्तीनें दिलेले तुमचे लक्ष रुपये तुच्छ मानून जो त्यांस स्पर्शही करणार नाहीं." याप्रमाणे बाणेदार उत्तर देऊन तो निस्पृह कवि जो तेथून निघाला तो दक्षिणेत येऊन त्यानें शिवछत्रपतीचा आश्रय केला. आणि त्यानें आमरणांत त्या पुण्यश्लोकाच्या मंगलकारक गुणवर्णनांत आपल्या

आयुष्याचा काळ सुखानें घालविला.

 भूषणकवीच्या काव्यांत प्रसादगुण अगदीं ओतप्रोत मरलेला आहे. त्याची कविता प्रासयमकादि शब्दालंकार आणि उपमारूपकादि अर्थालंकार यांनी फारच सुशोभित झालेली असून वीररस तर तींत केवळ मूर्तिमान् उभा आहेसें वाटतें. त्याने केलेल्या शिवभूषण काव्यांतील एखादें पद्य जरी वाचून पाहिले, तरी त्यांत वरील गुणांची झांक दृष्टी- स पडल्यावांचून रहाणार नाहीं. शिवराजभूषण ग्रंथाखेरी- ज भूषण कवीचे भूषणहजारा, भूषण उल्हास, दूषणउल्हास

इत्यादि आणखीही ग्रंथ आहेत. त्यानें केलेल्या भूषणह-