Jump to content

पान:लोकमित्र १८९५.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५४)

एक प्रकारची अभिमानबुद्धि वास' करीत होती. आप- ल्या धन्याचे यश कमाऊनच्या पहाडापर्यंत पसरलें आहे किंवा नाहीं हें पाहण्याची भूषणकवीस फार उत्कंठा होती. ह्मणून तो मुद्दाम पुनः एक वेळ कमाऊनच्या प- हाडांत गेला. व शिवाजीची कीर्ति तेथपर्यंत पसरलेली पाहून त्यास फार संतोष झाला.भूषण कवीच्या उत्कृष्ट कवित्वगुणांवर लुब्ध होऊन शिवाजीराजाही त्यास

वारंवार अनेक प्रकारच्या देणग्या देऊन खुष करीत असे.

 भूषण कवि पहिल्या प्रतीचा निस्पृह असे.. कमाऊन-च्या राजाशी जी त्याची चकमक झडली त्यावरून या त्याच्या स्वभावाची चांगली साक्ष पटते. त्याच्या अंगच्या याच स्वभावगुणामुळे त्यास शिवाजीराजासारख्या पु- लोक नृपाचा सहवास घडला. तो पहिल्या प्रतीचा स्पष्टवक्ता, समयसूचक, अत्यंत धीट, प्रेमळ अंतःकरणा- चा आणि अतिशय चतुर असा पुरुष होता. अस्तु. आतां त्याची कवित्वशक्ति आणि वर्णनचातुर्य यासंबंधानें एक खुवीदार आख्यायिका आहे ती देऊन हे अल्प चरि-

त्र समाप्त करितों.

 एके वेळीं भूषणकवि आपल्या वडील बंधूस भेटण्या करितां दिल्लीस गेला असतां, त्याच्या आगमनाचें वर्तमान बादशहास कळून त्यानें चिंतामणकवीस आपल्या बंधूस दरबारांत घेऊन येण्याविषयीं आज्ञा केली. चिंतामणकवीनें ही गोष्ट भूषणकवीस कळवितांच तो म्हणाला बादशहा आमच्या यजमानांचे शत्रु . त्यांचें दर्शन आह्मास कशाला पाहिजे? शिवाय आमचे मुखांतून शिवाजीमहाराजांच्या

प्रतापावांचून दुसरें कांहीं निघावयाचें नाहीं व त्यामुळे