पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३२ लो० टिळकांचे चरित्र भाग २ पात्र नाही असे का म्हणता ? तुम्ही आम्हाला अधिक शहाणे करण्याला आला हे खरे! पण किती दिवस शिकविणार ? दोन पिढ्या का तीन पिढ्या का कालाच्या अंतापर्यंत ? शिक्षकाने काही मुदतीत शिकवून मुलगा तयार केला नाही तर शिक्ष- कच नालायक ठरतो. आज देशी संस्थानात व्यवस्थित राज्यकारभार चालतो की नाही ? अधिकार द्या व चांगले चालविले नाहीत तर काढून घ्या. बादशहाला सिव्हिल सर्व्हेटानी कारभार केला काय किंवा आमच्या वेळवीनी केला काय एकच. गोऱ्या नोकरांच्या जागी काळे नोकर इतकाच फरक. हे म्हणण्यात राजद्रोह नाही. पोलिस शिपायाचा द्रोह म्हणजे राजद्रोह नाही. पोलीस शिपाई मी राजा म्हणणार हे ठीक आहे. पण आम्ही ते कसे मान्य करणार ? हीच गोष्ट सर्वांत वरीष्ठ अधिकाऱ्या- पर्यंत समजावी. जन्मभर आम्हाला सेवेत दिवस घालविण्याला लागले म्हणून काही गुण प्रगट दिसत नसतील. पण सेवा सोडून अधिकारीपणा आल्याशिवाय ते गुण तरी कसे दिसणार ? नुसते लखोट्यावर पत्ते लिहिण्याचे काम २५ वर्षे केले तरी आतल्या कागदावरचा मजकूर लिहिण्याला कसा येणार ? हल्लीच्या राज्यव्यवस्थेत अधिकार- विभागणी म्हणून काही आहे. पण ती अजूनहि जुन्या व्यापारी तत्त्वावर झालेली आहे. कंपनीचा राज्यकारभार म्हणजे केवळ एक प्रकारची मक्त्याची मामलत आहे. पुढे ही पद्धति चांगली नाही असे इंग्रजाना कळून आले. महाराणीने आपले हाती अधिकार घेतले. कंपनी गेली. पार्लमेंट आले. पण अजून हिंदुस्तानात कर कोणते बसवावे किती खर्च करावे हे स्टेट सेक्रेटरी ठरवितो. तोच खरा धनी. आणि त्याच्या हाताखाली गव्हर्नरसुद्धा सर्व नोकर. राणीच्या जाहिरनाम्याप्रमाणे धोरण खरोखर अमलात आले नाही. जाहीरनामा फुकट गेला. आम्हाला तेव्हा शिक्षण असते तर जाहिरनाम्याचे वेळी आम्ही आमच्या प्रजेच्या हिताची व्यवस्था मागितली असती. तेव्हापासून दादाभाईसारखे आमचे पुढारी लोक ही मागणी करीत आले आहेत. पुढे कायदे कौंसिल झाले. म्युनिसिपालट्या झाल्या. तथापि भाषणे करण्यापलीकडे खरी सत्ता हाती आली नाही. एरवीची भाषणे वर्तमानपत्रा- तून येतात. कौंसिलातील भाषणे सरकारी गॅझेटात येतात इतकाच फरक ! आम्ही अधिक अधिकाराची मागणी केली की म्हणतात 'हो तुम्ही तयार झाला की आम्ही बोटीत बसून विलायतेला निघालोच. ' मुदतीवर मुदती सांगतात. ' आशां काल- वर्ती कुर्यात् ' हे एक सूत्र आहे. त्याच्यामागून ' कालं विघ्नेन योजयेत्' हे दुसेर. याला धरूनच सर्व धोरण आहे. बोलता बोलता निमित्त सांगून विघ्ने आणतात. ही कलागत करण्याची यांची राजनीति जुनीच आहे. पाच सहा मेंबर्स केले तरी खरा फायदा नाही. लोकांची खात्री होऊन चुकली आहे म्हणून ते म्हणतात 'जे काय अधिकार द्यावयाचे ते निखालस तोडून द्या.' आम्हाला अधिकार देतात ते . कुंडीत झाड वाढविल्याप्रमाणे. पण मोठमोठ्या वृक्षांची बियाणी करावयाची तर वी पोत्यानेच ओतले पाहिजे. कुंड्यातली झाडे गोजिरवाणी दिसतात पण ती फार