पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग २ राजद्रोहाचा तिसरा खटला ३१ नव्हे. बंगालच्या चळवळीत फुल्लरसाहेव गव्हर्नर नको अशी लोकानी मागणी केली व शेवटी त्यानी राजीनामा दिला. तुम्ही काँग्रेस कॉन्फरन्स वगैरेमध्ये आपल्या तक्रारी सांगता गाऱ्हाणी गाता आक्षेपांच्या याद्याच्या याद्या मांडता पण ती दूर होण्याला ज्याच्या हाती सत्ता त्याला अर्ज करावा लागतो. पण ही गान्हाणी दूर करण्याची सत्ता आमची आम्हाला का असू नये ? भूक लागली म्हणजे मूल रडते पण आईं ते स्वतः न उमजून त्याला दुसराच काही उपचार करू लागते. पण मुलाला खरे काय होते ते त्याचे त्यालाच कळणार ! मुलासारखे आम्ही प्रजाजन दुबळे झालो आहो. पण प्रौढ झालो आहो म्हणून आमच्या गोष्टी आम्हाला कळतात. घरची व्यवस्था मनाप्रमाणे व्हावी असे वाटू लागते. अधिकाराची ही गोष्ट अशी की काही नियमानेच काम करावे लागते. तथापि तोच अधिकारी आमच्या तंत्राने वागणारा व दुसन्याच्या हाताने वागणारा ह्यात पुष्कळ भेद आहे. परकी अधिकारी घमेंडखोर असतात. प्रजेच्या दुःखाचा स्वतः त्याना अनुभव नसतो. म्हणून हा अधिकारीवर्ग बदलावा हे प्राप्त. तसे झाल्याशिवाय आम्ही मागाचे ते त्यानी नाही म्हणावे. आम्ही सांगावे त्याहून वेगळ्या रीतीने त्यानी करावे हे संपणार नाही. अधिकार मागतानाही आम्ही त्यांची आमची संयुक्त जवाबदारी असावी असेच म्हणतो. मुलगा बापाजवळ हौसेची जिन्नस मागतो. बाप नाही म्हणतो. त्यावेळी त्याला मुळीच कळत नाही व वाईट वाटते. पण त्याच्याहि हाती अधिकार दिला तर त्याला ती हौसेची जिन्नस घेऊ नये तिला किंमत अधिक पडते हे कळेल. ही दृष्टि प्रत्येक खात्याला लावली म्हणजे झाले. अधिकार अधिक चांगला कसा बजवावा हे त्याचे त्यालाच कळले पाहिजे व बाप मुलगा यांच्यामध्ये असा विरोध दिसतो. म्हणून कायद्याने मुलगा सज्ञान होण्याची मर्यादा घालून ठेविली आहे. पण राजनीतीच्या कायद्यात अशी मर्यादा कोण घालतो ? अशी मर्यादा घालून घेण्याचे आमचे प्रयत्न आहेत. ह्या चळवळीचे नाव होमरूलची चळवळ. गोष्ट साधी आहे. म्हणून तिचा कोणी विपर्यास करू नये. पुन्हा सांगतो की आमची तक्रार राजा बादशहाबद्दल नाही. तो देववंद्यच आहे. मधल्या देवताविषयी आमची तक्रार आहे. कोणी म्हणतो हिंदी लोक आज स्वराज्याला पात्र नाहीत. पण नाम- दार सिंह चौबळ हे एक्झिक्यूटिव्ह कौन्सिलर झाले ते लायक आहेतच की नाही ? बरे स्वतः त्यानी तरी आपणाला नालायक म्हणवून घेतले आहे काय ? मग ते अपात्र नाहीत तसे इतरहि अपात्र नाहीत. आम्ही पात्र का नाही ? शेक्सपिअरच्या नाटकात ज्यूने ख्रिस्त्याला जो प्रश्न विचारला तोच मी विचारतो. विलायतेतून गोरा करकरीत २१ वर्षीचा तरणाबांड येतो. आला की तो असिस्टंट कलेक्टर. ६० वर्षांचा मामलेदार असला तरी तो ह्याच्यावर. ह्याचे काम ह्याचा अनुभव सारा फुकट. त्याच्यापुढे ह्यानी उभे राहिले पाहिजे आणि पगार पाहिजे म्हणून हा उभा राहतो. आम्ही पात्रच नसतो तर राज्य कसे केले असते ? आज अराजक नाहीत तसे तेव्हाहि अराजक नव्हते. कृपा करा. थेट नाही असे स्पष्ट म्हणा. पण