पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग २ राजद्रोहाचा तिसरा खटला ३३ नाजूक फार दिवस टिकणारी नव्हेत. देशात कर वसूल कोणते करावे जमेच्या मानाने खर्च किती करावा ह्या आमच्या हिताच्या गोष्टी आम्हाला का कळणार नाहीत ? लढाईवर पैसा किती खचीवा हे बादशहा ठरवित नाही. मुख्य प्रधान ठरवितो. चूक झाली तर मुख्य प्रधान राजीनामा देतो. आणि त्याने राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात राजद्रोह होत नाही. होमरूल दिले म्हणजे इंग्रजांचे राज्य जाईल बुडेल असे नाही. ज्या ज्या दारातून आम्ही बाहेर जाऊ म्हणतो तेथे तेथे ब्यूरोक्रसी उभी आहे. तिला धक्का देऊन आम्हाला बाहेर जाणे आहे. तिची अडवणूक आम्हाला नको. आम्हाला आडवावयाचे ते अडवून शिवाय हा पगा रही भारी घेतो. आणि म्हणतो 'तुमच्याकरिता विलायतेतील थंड हवा सोडून इकडे आलो.' पण बाबा इकडे आलास तो तुला बोलाविला आहे कोणी ? होमरूल हे हल्लीच्या पार्लमेंटरी कायद्यात दुरुस्ती करून घ्यावयाचे व मिळवा- वयाचे आहे. त्याकरिता आम्ही काही कोणा परक्या राष्ट्राला आमच्यावर या म्हणत नाही. तुमच्याकडे अर्ज करितो. तुमचे राज्य देशात स्थिर व्हावे असे वाटते म्हणून हिंदी लोकानी धैर्य व शौर्य दाखवून युद्धात तुम्हाला मदत केली आहे. असो. ह्या चळवळीकरिता आम्ही संघ स्थापिला आहे आणि त्याला आज नाही तर उद्या तरी फळ येईल. राजनिष्ठा व अराजनिष्ठा ह्यांतील भेद सांगितला तो लक्षात ठेवा. ही चळवळ महाराष्ट्रात सुरू झाली आहे. यश येणे ईश्वराच्या हाती आहे. माझ्या डोळ्याला ते यश दिसणार नाही. पण कर्माला फळ आलेच पाहिजे. मनुष्य मोक्षा- करिता यत्न करितो. पण तो मोक्षहि त्याच्या डोळ्यादेखत त्याला मिळत नाही. तो मिळण्याला आधी मरावेच लागते. या बुद्धीने उद्योगाला प्रवृत्त व्हा. अहमदनगर येथील व्याख्याने यानंतर त्याच महिन्यात अहमदनगर येथे जिल्हा परिषद भरली. परि- पदेचे अध्यक्षस्थान केळकर यांना देण्यात आले होते. बेळगाव येथे होमरूल लीग कॉन्फरन्स भरली तेव्हाच या स्थानाची सुपारी केळकराना देण्यात आली होती. कारण नगरास भरणारी सभा नेहमीच्या जिल्हा सभेच्या स्वरूपाचीच होती तरी तेव्हा नव्या होमरूल लीगच्या चळवळीचे प्रतिबिंब त्या सभेत व बाहेरहि पाड- ण्याचा चालकांचा विचार होता. आणि केळकर हे होमरूल लीगचे चिटणीस असल्यामुळे त्यांना अध्यक्ष केल्याने हे दुतर्फी काम आपोआप साधणारे होते. नगरास लोकमान्य टिळकांनी यावे अशी तेथील मंडळीची फार इच्छा होती. परंतु जिल्हा परिषदेचा मान हा त्यांना देण्याला फार अल्प. म्हणून तो मान केळकराना द्यावा व लोकमान्य टिळकांना स्वतंत्र निमंत्रण देऊन त्यांचा विशेष सत्कार करावा अशी योजना होती आणि ती तडीस गेली. अहमदनगर येथील जिल्हा परिषद तारिख ३१ मे रोजी भरली होती. स्वागताध्यक्षाचे स्थान रा. व. दि० उ...९ 6