पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३० लो० टिळकांचे चरित्र भाग २ घेतो. अशा रीतीने ते जीवच भृङ्गमय होऊन जातात. टिळकांचीही गोष्ट तशीच आहे. " नंतर टिळकानी व्याख्यान देण्याला सुरवात केली. म्हणाले " ह्या चार दोन दिवसात ज्या विषयाची आपण चर्चा केली आणि ज्याकरिता हा नवा संघ स्थापिला त्याविषयीच मी दोन शब्द सांगणार आहे. स्वराज्य म्हणजे काय या- विषयी पुष्कळाना अज्ञान असते. कित्येकाना ते खरे कळूनहि त्याचा ते विपर्यास करितात. कित्येकाना ती गोष्टच मुळी नको असते. म्हणून 'स्वराज्य' हे काय त्याची मागणी कशी करावी आणि का करावी हे पाहिले पाहिजे. हा प्रश्न केवळ माझ्याच उद्योगाने उत्पन्न झाला आहे असे नाही. स्वराज्याची कल्पना फार जुनी आहे. देशात राज्य आहे पण ते 'स्व' नाही म्हणूनच हा उद्योग. राज्य कितपत चांगले कितपत वाईट हा प्रश्न नाही. राज्य परकीयांचे आहे ही गोष्ट निर्विवाद आहे. जुने हिंदुराज्य मोडून इंग्रजी राज्य का व कसे बनले हे मी आज सांगत नाही. विलायतेत बादशहा आहे पण तो नांवाचा आहे. तिकडील तरतरीत सुशिक्षित लोक येऊन राज्य करितात व आपल्या बुद्धीप्रमाणे ते राज्याची व्यवस्था चांगली करितात. देशात आज अराजक खास नाही. सरकार आहे आणि ते पाहिजेच आहे. अराजक म्हणजे काय हे आपल्या जुन्या इतिहासावरून माहितीच आहे. असो. राजसत्तेचे दोन विभाग असतात. एक सल्लागार मंडळ व एक कार्यकारी मंडळ. इंग्रजी राष्ट्राच्या मदतीने सहानुभूतीने त्यांच्या देखरेखीखाली आम्हास आपले कल्याण करून घ्यावयाचे आहे ही गोष्ट खरी. पण ज्याच्या साहाय्याने ही गोष्ट घडावयाची आहे ते सरकार अव्यक्तच आहे. परब्रह्माहून माया जशी वेगळी तसेच अव्यक्त सरकारपासून व्यक्त सरकार हे वेगळे असते. आणि ते व्यक्त सरकार वेळोवेळी पालटते. 'स्वराज्य' हा शब्द ह्या व्यक्त सरकारला उद्देशून आम्ही योजितो. स्वराज्याचा प्रश्न म्हणजे राज्यकारभाराचा प्रश्न होय. अव्यक्त सरकार आम्ही बदलू इच्छीत नाही. पण व्यक्त सरकार बदलावे असे आमचे म्हणणे आहे. आज जे कारभार करितात त्यांच्याहून वेगळ्या लोकांच्या हाती वेगळ्या पद्धतीने कारभार दिला असता तो लाभदायक होईल अशी समजूत. स्वतः राजा प्रजेच्या अनहिताची गोष्ट कोणतीच करू शकत नाही असा इंग्रजी राजनीतीचा सिद्धांत आहे. इंग्लंडातहि प्रधानमंडळ बदलत असते. पार्लमेंटातील पक्ष परस्पर भांडतात व प्रधानमंडळ बदलतात. राजाला कोणतेही प्रधानमंडळ सारखेच असते. तो निर्गुण परब्रहास्वरूप आहे. मोठ्या मोठ्या प्रसंगी देवा- सारखी त्याची मिरवणूक निघते व लोकनिष्ठा करणारे वेगळेच असतात. हा कारभार ह्या पर्यंतच्या अधिकारी मालकाच्या हाती आहे. शिपाई बदलावा व दुसरा नेमावा असे म्हटले कलेक्टर नको व्हाइसरॉय नको स्टेट सेक्रेटरी नको असे म्हटले तरीही तो राजद्रोह व्यक्त होते. पण प्रत्यक्ष कारभार देशात स्टेट सेक्रेटरीपासून पाटला- अर्थात अधिकारी सैन्यातला एक असता राजद्रोह नाही. तसेच हा