पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग २ राजद्रोहाचा तिसरा खटला २९ घेतले ते व्याख्यानांची मोहीम. या मोहिमेला त्यानीच वेळगावास ता. १ मे रोजी प्रारंभ केला. नंतर संघाचे चिटणीस केळकर यानी पुणे येथे ता. २६ सपटंबर रोजी किर्लोस्कर थिएटरात होमरूल या विषयावर इंग्रजीत निबंध वाचला. अध्यक्षस्थानी बॅरिस्टर बॅपटिस्टा हे होते. व्याख्याने काही एका पद्धतीने व्हावी कोणी भलते सलते बोलू नये असे ठरल्यामुळे केळकरानंतर फक्त वॅपटिस्टा यांचेच भाषण होऊन सभा विसर्जन करण्यात आली. पण याप्रसंगी सरकारी रिपोर्टरांकरिता नेहमीहून दोन तीन खुर्च्या अधिक ठेवा अशी केळकराना पोलिसाकडून विनंति करण्यात आली. कारण विचारता त्यानी असे सांगितले की या व्याख्यानमालेची व्याख्याने संपूर्ण टिपून घेण्याकरिता स्वतः गव्हर्नरच्या कौंसिलाचे लघुलेखक पाठविण्यात येणार आहेत. त्यावर केळकर म्हणाले " होमरूलच्या चळवळीला हा विशेषच मान म्हणाव- याचा की पोलीस रिपोर्टरानी काम भागत नाही. खुद्द गव्हर्नरसाहेबांचे रिपोर्टर यावे लागतात. पण आनंदाची गोष्ट ही की पूर्वी आमच्या भाषणांचे मोडके तोडके रिपोर्ट सारांशरूपाने वर पाठविले जात. आपली व्याख्याने ज्याना उद्देशून दिली जातात त्यानीच ती स्वतः आपल्या कानानी ऐकावी अशी आमची फार इच्छा. पण आमची व्याख्याने ऐकण्याला गव्हर्नर व कौन्सिलर यानी समक्ष येण्याचा मान आम्हाला पूर्वी कधी मिळाला नाही तो आता अप्रत्यक्ष तरी मिळणार म्हणावयाचा ! कारण रिपोर्टर संपूर्ण भाषणाचे साग्र रिपोर्ट पाठविणार ते कौन्सिलर व कदाचित् गव्हर्नरसाहेबहि स्वतः वाचणार. कसेहि असो, आमच्या कार्याचा जय आहे खरा.' बेळगांव येथील व्याख्यान " बेळगावास मे महिन्यात होमरूल लीगची सभा झाल्यावर इतिहास संशोधक मंडळामार्फत सभा भरविण्यात आली. पुण्यास हे मंडळ नुकतेच स्थापन करण्यात आलेले होते. त्याच्या प्रसाराचे काम सुरू झाल्याने बेळगावास जमलेल्या मंडळीकरिता ही सभा मुद्दाम बोलाविण्यात आली होती. सभेत मंडळाचे हेतू वगैरे सांगण्यात येऊन जुन्या इतिहासाचे संशोधन करण्याविषयी कळकळीची विनंति करण्यात आली. ही सभा संपताच त्याच जागी सायंकाळी ६ ते ७ || पर्यंत टिळकांचे होम- रूलवर पहिले व्याख्यान झाले. प्रथम नामदार वेळवी यानी दादासाहेब खापर्डे यानी अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी सूचना केली. त्याला मासूर वकील यानी अनुमोदन दिले. दादासाहेब खापर्डे म्हणाले " आज स्वराज्यासारखा विषय व त्यावर व्याख्यान देण्याला टिळकांसारखा बक्ता हा मोठा योग सुदैवाने आला आहे. स्वराज्यसंघाची स्थापनाहि आजच झाली आहे. टिळकांचे भाषण ऐकून आपण त्यांचे ह्या चळवळीतील शिपाई बनावे आणि चळवळ पुढे चालवावी. कोणत्याहि विषयाचा मनुष्य जसजसा विचार करू लागतो तसतसा तो तद्रूप बनतो. भृङ्ग नावाच्या किड्याला स्वतःची संतति नसते. परंतु तो बाहेरचे जीव धरून आणून ठेवतो. आणि त्यांच्याकडे नित्य पाहतो व त्यांचे लक्ष आपणाकडे वेधून