पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग २ राजद्रोहाचा तिसरा खटला २५ यापरता अधिक उठाव घेण्याइतके मुळातच अधिष्ठान नव्हते. तेव्हा सरकारानेहि जे काय केले ते जामीन घेण्याचीच नोटीस काढिली. पण कसेहि असले तरी ते संकटच. लहानसे झाले तरी ते संकटच. पण लोकांपेक्षा टिळकांच्या दृष्टीने उद्वेग कारक असले तर आपण उभारलेल्या चळवळीला पायबंद कदाचित येणार हेच खरे संकट होते. केसरीने म्हटल्याप्रमाणे उतारवयातील वाढदिवस म्हणजे सुखाच्या कोंदणात बसविलेले ते दुःखच होय. पण सुख व दुःख ही दोन्ही समान पाह- ण्याची टिळकांची प्रवृत्ति असल्यामुळे चौकट व आतले चित्र ही दोन्ही मिळून एकच चित्र होय असे त्यानी मानले. त्यांच्यातील सुज्ञमंडळीनीहि त्याहून अधिक महत्त्व या प्रसंगाला दिले नाही. आणि जसे काही संकट आलेच नाही अशा खुल्या दिलाने आणि एकंदरीत आनंदी वृत्तीने समारंभ पार पाडला. (७) राजद्रोहाचा तिसरा खटला एका वीस वर्षांचे आत टिळकावर राजद्रोहाचे तीन खटले झाले. पहिला १८९७ साली. त्याचे वर्णन या चरित्रग्रंथाच्या पहिल्या खंडात आले आहे. दुसरा १९०८ साली. त्याचा समग्र वृत्तांत प्रस्तुत खंडाच्या एका प्रकरणात आहे. तिसरा खटला १९९६ साली झाला. दुसऱ्या खटल्यातील सहा वर्षांची शिक्षा भोगून टिळक परत आल्याला यावेळी अवधी दोनच वर्षे झाली होती. यावरून टिळकावर राजद्रोहाचे खटले करण्यास सरकारला कंटाळा आला नव्हता हे उघड आहे. पण ज्या उद्गारामुळे सरकारला राजद्रोहाचे खटले करण्याची इच्छा होते. असले उद्गार भाषणातून किंवा लेखातून काढण्याला टिळकानाहि कंटाळा नव्हता ही गोष्ट मात्र विशेष लक्षात ठेवण्यासारखी आहे. सरकारला कंटाळा नसतो याचे कारण तीच ती गोष्ट करण्याचा प्रसंग एकाच अधिका-याला येत नाही. १८९७चा खटला लॉर्ड सँडहर्स्ट यांच्या कार- कीर्दीत झाला. १९०८ च्या खटल्याच्या वेळी सर जॉर्ज सिडन हॅम क्लार्क है गव्हर्नर होऊन आले होते. १९९६ साली खटला झाला तो लॉर्ड विलिंगडन यांच्या गव्हर्नरीत. दर वेळी नव्या गव्हर्नराचा नवा दम. प्रत्येकाचे सल्ला- गार वेगळे. खटला चालविणारे वकील बॅरिस्टर वेगळे. न्यायमूर्ति वेगळ्या. तुरुं गाचे अधिकारी व तुरुंगाच्या जागा वेगळ्या. राजद्रोहाचे कलमच काय ते जुने. पण तेहि पहिल्या व दुसऱ्या खटल्याचे मध्यंतरी सरकारने बदलून हवे तसे करून घेतलेच होते. पैशाचा तर प्रश्नच नाही ! तात्पर्य टिळकावर राजद्रोहाचे खटले नवे नवे पुनः पुनः करण्याचा कंटाळा येण्याचे सरकारला काय कारण ? उलट टिळकांची स्थिति कशी होती पहा. राजद्रोहाचा खटला म्हणजे ते एक संकटच. आणि एकाच माणसाने तीच ती संकटे पुनः पुनः सोसावयाची म्हणजे त्याला सहजच कंटाळा येणार. किंबहुना कंटाळा हा शब्द या कामी अपु--- टि. उ...८